Weather Alert : राज्यात रविवारचा दिवस वादळी पावसाचा, 18 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
राज्यात गेले काही दिवस मान्सून पूर्व पाऊस कायम आहे. विविध भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. 25 मे रोजीही राज्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, केरळमध्ये यावर्षी 24 मे रोजी मान्सूनचे आगमन झाले. सामान्यतः जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये मान्सून दाखल होतो. मात्र यावर्षी आठ दिवस आधीच तो दाखल झालाय. त्यामुळे हवामान खात्याने महाराष्ट्रातही मान्सून लवकरच पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पाहुयात पुढील 24 तासांत राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
advertisement
advertisement
हवामान विभागाने राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या सर्व भागांतील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, जळगाव, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, यवतमाळ, अमरावती, नागपूरसह विदर्भातील इतरही या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
advertisement









