Weather Alert: महाराष्ट्रात रविवारचा दिवस जोरदार पावसाचा, 25 जिल्ह्यांना अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पुढील 24 तासांमध्ये देखील राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार तर बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
राज्यात होत असलेला जोरदार पाऊस सुरूच आहे. पुढील 24 तासांमध्ये देखील राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार तर बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. या पावसाबरोबर विजांचा कडकडाट आणि वादळी वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. पाहुयात 21 सप्टेंबर रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये साधारणपणे ढगाळ आकाश राहील तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. मुंबईतील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्गमध्ये ही विजांसह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








