Ram Navami 2024: अयोध्येच्या राम मंदिरात पहिल्यांदाच असं घडलं, रामलल्लाच्या मूर्तीवर…Photos
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Ram Navami 2024: आयोध्येत प्रभु श्रीरामाचा ‘सूर्य तिलक’समारोह पार पडला. सर्व जय्यत तयारी करण्यात आली होती. आज रामनवमीच्या दिवशी दुपारच्या वेळी सूर्याची किरणे रामलल्लाच्या कपाळाला टिळा लावायला आली. आरसे आणि लेन्सचा समावेश असलेल्या विस्तृत प्रणालीद्वारे हा सूर्य तिलक लावण्यात आला. (सर्व छायाचित्र सौजन्य - डीडी न्यूज)
या प्रोजेक्टचं नाव ‘सूर्य तिलक प्रोजेक्ट’ आहे. काउंन्सिल ऑफ सायंटिस्ट अँड इंडस्ट्रीअल रिसर्च (सीएसआयआर) - सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्युट (सीबीआरआय) रुरकीतील शास्त्रज्ञ डॉ. एस. के. पाणिग्रही म्हणाले की, रामनवमीला श्रीरामाच्या मूर्तीच्या कपाळावर टिळा लावणं हा सूर्य तिलक प्रोजेक्टचा मूळ उद्देश आहे. या अंतर्गत दुपारी रामाच्या कपाळावर सूर्यप्रकाश पाडण्यात आला.
advertisement
डॉ. पाणिग्रही म्हणाले, ‘या प्रोजेक्टअंतर्गत दरवर्षी चैत्र महिन्यात रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून रामाच्या कपाळावर सूर्यप्रकाशाचा टिळा लावला जाईल. दरवर्षी या दिवशी सूर्याची आकाशातील स्थिती बदलते. तपशीलवार गणनातून असं निदर्शनास येतं की, दर 19 वर्षांनी रामनवमीच्या तारखेची पुनरावृत्ती होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement