'या' 11 गणपतींचं एकदा तरी घ्या दर्शन, एकाचा आहे शिवाजी महाराजांशी संबंध!
- Published by:News18 Marathi
Last Updated:
महाराष्ट्रात अष्टविनायकांबरोबरच प्रत्येक गावाची आणि शहराची खास अशी गणेश श्रद्धास्थाने आहेत. अशा गणेश स्थानांविषयीची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सगळीकडे लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी आहे. महाराष्ट्रात अष्टविनायकांबरोबरच प्रत्येक गावाची आणि शहराची खास अशी गणेश श्रद्धास्थाने आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांची वैशिष्ट्ये निरनिराळी आहेत. अशा गणेश स्थानांविषयीची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर - चिंचवड स्टेशनपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर मोरया गोसावी मंगलमूर्तीचे मंदिर आहे. ही उजव्या सोंडेची गणेशमूर्ती आहे. महाराष्ट्रातील थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी या गणेशाची स्थापना केली. हे एक जागृत गणेशस्थान आहे. 1655 मध्ये मोरया गोसावी यांनी येथे जिवंत समाधी घेतली. त्यानंतर 1659 मध्ये त्यांच्या चिरंजीवांनी येथे मंदिर उभारले.
advertisement
advertisement
advertisement
अहमदनगरमधील विशाल माळीवाडा गणपती - नगर शहराच्या दक्षिणेकडे माळीवाडा वेशीने आत जात असताना हे पुरातन गणेश मंदिर लागते. येथील गणेशमूर्ती 10 फूट उंच, उजव्या सोंडेची आहे. असे सांगतात की सुमारे साठेक वर्षांपूर्वी या गणेशमूर्तीला घाम आला होता. तेव्हा यज्ञयागादीक करून तो थांबविण्यात आला. तेव्हापासून हे मंदिर भक्तांमध्ये विशेष प्रसिद्ध पावले आहे.
advertisement


