16 एकर जागा अन् 72 फूट उंची, जगातील सर्वाधिक वजनाची गणेशमूर्ती पाहिलीत का?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
72 फूट उंचीच्या गणेश मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी पायथ्यापासून एकूण 179 पायऱ्या चढून जावे लागते.
गणपतीची प्रसिद्ध, ऐश्वर्यसंपन्न, भक्तांच्या गर्दीने गजबजलेली स्थळं सर्वानाच माहीत असतात. पण काही मंदिरं या सगळ्या झगमगाटापासून दूर कुठे तरी रानावनात, डोंगरकपारींत, गडकिल्ल्यांवर एकटीच वसलेली असतात. निसर्गाच्या सान्निध्यात अगदी साधेपणाने असणाऱ्या गणेशाच्या 72 फुटी मूर्ती विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत सोमाटणे फाटा येथे सह्याद्रीच्या डोंगररांगांत सरला बसंतकुमार बिर्ला यांच्या संकल्पनेतून 72 फूट उंचीची भव्य गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे. तिचे वजन 1 हजार टन असून ती जगातील सर्वाधिक वजन असलेली गणेशमूर्ती म्हणून ओळखली जाते.
advertisement
सिमेंट काँक्रीट, स्टील, तांबे वापरत मूर्ती उभारण्यासाठी अडीच वर्षे लागली. जानेवारी 2009 मध्ये या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी पायथ्यापासून एकूण 179 पायऱ्या चढून जावे लागते. दर 4 वर्षांनी मूर्तीवर तांब्याचा लेप लावून तिला नवी झळाळी देण्यात येते. ही मूर्ती राजस्थानचे कारागीर मातुराम वर्मा व नरेश वर्मा यांनी घडवली आहे.
advertisement
advertisement
advertisement
नैसर्गिक सौंदर्य आणि हिरवाईने वेढलेले पुण्यातील बिर्ला गणपती मंदिर असंख्य भाविकांना आकर्षित करते. संध्याकाळी या ठिकाणी लाईट्स सोडल्याने मूर्ती आणखीच सुंदर दिसते. या ठिकाणावरून जुना पुणे-मुंबई रस्ता, देहूरोडचा काही भाग व आजुबाजूचा परिसर छान दिसतो. विशेषतः पावसाळ्यात हा परिसर सभोवतातील हिरव्यागार शेतीमुळे पाहण्यासारखा असतो
advertisement