कृष्णा नदीत आहे मत्स्याकार मंदिर, पुरातन ढोल्या गणपतीबाबत माहितीये का?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
वाईतील प्रसिद्ध गणपती मंदिर हे अठराव्या शतकातील आहे. मराठा सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी 1762 मध्ये कृष्णा नदीच्या पात्रात हे मंदिर बांधलं.
कृष्णा नदीच्या काठी अनेक वेगवेगळ्या देवी-देवतांची मंदिरे आहेत. असंच एक अत्यंत पुरातन गणपती मंदिर सातारा जिल्ह्यातील वाईत आहे. मत्स्याकारात असणारं हे मंदिर 1762 मध्ये सरदार रास्ते यांनी बांधलं. या मंदिरामध्ये एका सलग दगडातून घडवलेली गणपतीची भव्य मूर्ती आहे. गणपतीच्या भव्य आणि विशाल आकारामुळे त्याला महागणपती किंवा ढोल्या गणपती असंही म्हटलं जातं. याच मंदिराबाबत विश्वस्त विश्वास गोखले यांनी माहिती दिलीय.
advertisement
advertisement
advertisement
वाईतील प्रसिद्ध गणपती मंदिराची बांधणी ही मत्स्याकार स्वरुपाची आहे. कृष्णा नदीच्या काठी हे मंदिर असून पुराच्या पाण्यापासून संरक्षणाची योग्य ती काळजी घेण्यात आलीय. त्यासाठी गर्भगृहाच्या मागच्या भिंतीची रचना नावेच्या टोकासारखी म्हणजेच मत्स्याकार बांधलेली आहे. मत्स्याकार रचनेमुळे नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर पाणी दुभंगलं जातं. त्यामुळे पाण्याचा दाब कमी होतो आणि मंदिर सुरक्षित राहतं, असं गोखले सांगतात.
advertisement
advertisement
advertisement
या मंदिराबाबत काही आख्यायिका अनेक वर्षांपासून सांगण्यात येत आहेत. यात दरवर्षी हा गणपती थोडा थोडा लहान होत आहे असं सांगण्यात येतं. मात्र विश्वस्त विश्वास गोखले यांनी या सर्व आख्यायिका चुकीच्या असल्याचं सांगितलं. या गणपतीची उंची आहे तेवढीच आहे. मुकुट खराब झाल्याने गणपतीचा मुकुट आता गोलाकार केला आहे. त्यामुळे या मूर्तीची उंची कमी झाल्याचं भासत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. (शुभम बोडके, प्रतिनिधी)