विदर्भातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात होतं घंटा दान, अनोख्या प्रथेबद्दल माहितीये का?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Amita B Shinde
Last Updated:
मनोकामना पूर्ण झाल्यावर भाविकांकडून हनुमान मंदिराला घंटा दान दिली जाते आणि रोडग्याचा नैवद्य अर्पण केला जातो.
महाराष्ट्रातील गावोगावी विविध मंदिरे असून प्रत्येक मंदिराबाबत एखादी आख्यायिका असते. काही मंदिरांशी खास प्रथा किंवा परंपरा जोडल्या गेलेल्या असतात. अशीच अनोखी प्रथा वर्धा जिल्ह्यातील वर्धा देवळी मार्गावर असणाऱ्या सालोड येथील प्रसिद्ध मंदिराबाबत आहे.
advertisement
advertisement
"पूर्वी वर्धा येथील बजरंग परिहार नावाचे एक गृहस्थ होते. त्यांना या ठिकाणी काहीतरी दृष्टांत झाला. त्यामुळे याठिकाणी त्यांनी हनुमानाचं छोटंसं मंदिर बांधले. बरेच वर्ष त्यांनी सेवा केली. मात्र काही वर्षांनी वृद्धापकाळाने त्यांच्याकडून सेवा होत नव्हती. त्यामुळे मंदिराकडे दुर्लक्ष होऊ लागलं. मग मी सालोड येथील रहिवासी असल्याने नेहमी मंदिरात यायचो. जवळजवळ 45 वर्षांपासून मी याठिकाणी येतोय. सुरवातीला मंदिरात मला लाईट नव्हती. लोकवर्गणीतून येथील विकासकामे केल्याचे विष्णुकुमार वांदिले यांनी सांगितले.
advertisement
हनुमान मंदिराची हळूहळू महती वाढत गेली. सर्वात प्रथम रुपराव हनुमंतराव झाडे यांनी एक मोठी घंटा दान केली. नंतर हळूहळू लोकांना या ठिकाणी घंटा दान करण्यास सुरुवात केली. मनोकामना पूर्ण झाल्यावर घंटा दान करण्याचं प्रमाण वाढत गेलं. एकदा असही झालं की काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे निवडून येण्यापूर्वी त्यांनी या ठिकाणी मोठी पूजा अर्चना केली होती. तिन्ही जागांपैकी एकटे कांबळे निवडून आले. तेव्हापासूनही या ठिकाणची प्रसिद्धी वाढत गेली, असंही वांदिले यांनी सांगितलं.
advertisement
सुरेंद्र महाकाळकर आणि रमेश होळघरे यांनी मंगल कार्यालयासाठी जागा दिली. या ठिकाणी मंगल कार्यालय बांधण्यात आलं असून वाढदिवस, लग्न, साक्षगंध अशासारखी शुभकार्य या ठिकाणी होत असतात. कालांतराने या मंदिरात मंगल कार्यालयासह शिवपंचायत आणि राम लक्ष्मण सीतेची मूर्तीही स्थापन करण्यात आली. त्यामुळे मंदिरात हनुमान जयंती महाशिवरात्री आणि रामनवमी आणि पौष पौणिमेला घोडेवाले बाबा यांचा पुण्यतिथी उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरे होतात.
advertisement
नागपूर, यवतमाळ, अमरावती यासह इतरही जिल्ह्यातील भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि मनोकामना पूर्ण झाल्यावर मोठा स्वयंपाक करतात. विशेषतः विदर्भातील प्रसिद्ध पाणग्यांचा म्हणजेच रोडग्यांचा नैवद्य याठिकाणी केला जातो. लोकसहभागातून मंदिराच्या विकासकामत मदत होतेय. मंदिरात आयोजित केल्या जाणाऱ्या रामनवमी, हनुमान जयंती कार्यक्रमात मोठ्या संख्येने भक्तांचा सहभाग असतो.
advertisement


