2 फुटाची हनुमान मूर्ती 50 वर्षांत झाली 6 फूट, महाराष्ट्रातील या मंदिरात खरं काय घडतंय?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पूर्वी मंदिर लहान बांधले होते आणि आताचं हे मंदिर आणि गाभारा तिसऱ्यांदा बांधला आहे.
वर्धा जिल्ह्यातील वर्धा -आर्वी मार्गावर असलेल्या सेवा येथील महारुद्र हनुमान देवस्थानाची ख्याती सर्व दूर पसरलेली दिसून येते. सेवा येथील मारुती मंदिराला अंदाजे 70 ते 75 वर्षांचा इतिहास असल्याचं सांगितलं जातं. या मंदिरातील हनुमानाची मूर्ती ही दिवसेंदिवस वाढत असून मूर्तीवर नैसर्गिक रित्या काही बाण दिसून येतात आणि या बाणांची वाढ होत असल्याचं सांगितलं जातं. मंदिरात नतमस्तक होऊन हनुमान चरणी प्रार्थना केल्यानंतर आपल्या मनोकामना पूर्ण होतात,अशी भाविकांची श्रद्धा आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मंदिरात आतील भाग अतिशय मन प्रसन्न करणारा आहे. याठिकाणी शिव पंचायत आणि प्रभू श्री रामाचं मंदिर ही आहे. आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी भक्त भव्य महाप्रसाद आयोजित करतात. आणि पाणग्यांचा नैवेद्य दाखवतात. तसेच अनेक भक्त याठिकाणी मूर्तीला चांदीचे डोळेही दान करतात. सण उत्सवात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग असतो.
advertisement
advertisement
advertisement