Nag Panchami 2024: यंदाच्या नागपंचमीला अतिशय शुभ योग; कालसर्प दोषापासून मुक्तीसाठी करा ही विशेष पूजा
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
Nag Panchami 2024 : श्रावण महिन्यात नागपंचमी हा सण देखील साजरा केला जातो. शंकराच्या गळ्याभोवती असलेल्या नाग देवतेची विधीवत पूजा केल्यास व्यक्तीला कुंडलीतील कालसर्प दोषापासून मुक्ती मिळू शकते. याशिवाय, रात्री सतत पडणाऱ्या सापांच्या स्वप्नांपासूनही मुक्ती मिळू शकते.
हिंदूधर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात शंकर आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असं म्हटलं जातं. उत्तर भारतीय पंचांगानुसार यंदा 22 जुलैपासून (सोमवार) श्रावण महिना सुरू झाला आहे आणि 19 ऑगस्टला संपणार आहे. तर मराठी पंचांगानुसार 5 ऑगस्टपासून श्रावणाची सुरुवात होत आहे.
advertisement
advertisement
नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. त्यानंतर गव्हाचं पीठ मळा आणि या पिठापासून नागदेवतेची मूर्ती बनवा. या मूर्तीला हळदी-कुंकू वाहून घराच्या दरवाजाबाहेर ठेवा. त्यावर फुलांचा हार, दूध आणि लाह्या अर्पण करा. धूप आणि अगरबत्ती लावून मूर्तीची पूजा करा. या पूजेनंतर घराजवळ असलेल्या मंदिरात नागेश्वर शिवलिंग असेल तर त्याची पूजा करावी. असं केल्याने व्यक्तीला कुंडलीतील कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते.
advertisement
<strong>या वेळी <a href="https://news18marathi.com/tag/nagpanchami/">नागपंचमीच्या दिवशी </a>शुभ सिद्ध आणि साध्य हे दोन योग तयार होत आहेत. शंकरासोबत नागदेवतेची पूजा केल्याने रोग आणि अडथळे दूर होतील. नागदेवता शंकराला अतिशय प्रिय आहे. कारण, समुद्रमंथनातून निघालेलं विष प्राशन केल्यानंतर शंकराच्या गळ्याचा दाह नागदेवतेने थांबवला होता, असं मानलं जातं.</strong>
advertisement
advertisement


