Garuda Purana: पैसा धन-संपत्ती टिकवून ठेवायचं असेल तर काय करावं? पहा गरुड पुराणातील नियम
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Garuda Purana Tips : गरुड पुराणाला महापुराण मानलं गेलं आहे. हिंदू धर्मातील हा एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. यात भगवान विष्णू आणि त्यांचं वाहन गरुड यांच्यातील संवाद आहे. ज्यात जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या विविध गोष्टींचे वर्णन आहे. गरुड पुराणात व्यक्तीच्या जन्म-मृत्यूदरम्यान केलेल्या कर्मांविषयी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्याचे पालन केल्याने माणूस आपलं जीवन यशस्वी होऊ शकतो. यासोबतच जीवन पूर्णपणे जगण्याचा आणि योग्य मार्गावर चालण्याचा मार्गही सांगण्यात आला आहे.
advertisement
advertisement
- हिंदू धर्मात महिलांना लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि स्त्रीचा अपमान करणं म्हणजे लक्ष्मीचा अपमान आहे. गरुड पुराणानुसार घरातील महिलांचं रक्षण करू शकत नसेल ते धन लवकर नष्ट होतं. तसंच अशा ठिकाणी माता लक्ष्मी कधीही वास करत नाही. त्यामुळे धन असेल आणि ते टिकवून ठेवायचं असेल तर महिलांचा आदर सम्मान करायला हवा.
advertisement
advertisement
advertisement
-गरुड पुराणानुसार माणसाजवळ अमाप धन असेल, पण त्याचा योग्य वापर केला जात नसेल, तर ते व्यर्थ आहे. असलेलं धन टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यात भर पडावी, यासाठी त्या धनाचा योग्य वापर होणं आवश्यक आहे. घरातील महिलांचा सन्मान करून, गरजूंना दान करून तुम्ही लक्ष्मी मातेचे आशीर्वाद घेऊ शकता. लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न असेल तर तुमच्या संपत्तीत वाढ होत जाईल. त्यामुळे ती नाराज होईल, अशा कृती माणसाने करू नयेत.