चैत्र की कार्तिक, मारुतीरायांचा जन्म नक्की कधी झाला? 2 वेळा का साजरी करतात जयंती?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
हनुमान जयंती वर्षातून दोनवेळा साजरी केली जाते. पहिली चैत्र मासाच्या पौर्णिमा तिथीला आणि दुसरी कार्तिक मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला. त्यामुळे हनुमान जयंती नेमकी कधी साजरी करावी याबाबत अनेकजणांच्या मनात गोंधळ असतो. आज हा गोंधळ पूर्णपणे दूर होईल कारण आपण काशीचे ज्योतिषी याबाबत काय सांगतात जाणून घेणार आहोत. (अभिषेक जायसवाल, प्रतिनिधी / वाराणसी)
advertisement
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुतीराया बालपणी एकदा निद्रावस्थेतून जागे झाल्यावर भूकेने व्याकूळ झाले होते. त्यांनी एका झाडाजवळ लालचुटूक फळ पाहिलं. ते फळ घेण्यासाठी धावत निघाले मात्र ते कोणतंं फळ नव्हतं तर साक्षात सूर्यदेव होते. त्याचवेळी राहू सूर्याला ग्रहण लावण्याच्या तयारीतच होता. परंतु मारुतीरायांना सूर्याकडे धावताना बघून ते जरा थांंबले. ते मदतीसाठी इंद्रदेवांकडे गेले. मग देवांचे देव इंद्रदेवही तिथे प्रकट झाले. मारुतीरायांची सूर्याला धडक होऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या दिशेने आपलं एक शक्तीशाली शस्त्र भिरकावलं.
advertisement
धार्मिक मान्यतेनुसार, मारुतीरायांना पवनपुत्र मानलं जातं. पवन म्हणजे वारे. वरील घटनेनंतर वारे क्रोधीत झाले. त्यांनी वायूमंडळातून वाऱ्यांचा वेग थांबवला. त्यानंतर ब्रह्मा इतर देवतांसह वायूदेवांकडे गेले आणि त्यांनी मारुतीरायांना दुसरं जीवन प्रदान केलं. तसंच इतर देवतांनी आपली शक्ती त्यांना प्रदान केली. त्याच दिवशी मारुतीरायांना दुसरं जीवन मिळालं. हा दिवस होता चैत्र मासातील पौर्णिमा तिथीचा. म्हणूनच आता या तिथीला हनुमान जयंती साजरी केली जाते.
advertisement
तसंच कार्तिक मासातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मारुतीरायांचा जन्म झाला होता, असा संदर्भ विविध पुस्तकांमध्ये आढळतो. धार्मिक कथांनुसार, या दिवशी अंजनी मातेच्या पोटी मारुतीरायांनी जन्म घेतला होता. म्हणूनच ही तिथीसुद्धा हनुमान जयंती म्हणून धुमधडाक्यात साजरी केली जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)