WI vs AUS : 30 वर्षांनंतर वेस्ट इंडिजने केली ऑस्ट्रेलियाची हालत खराब, पहिल्याच दिवशी 57 ओव्हर्समध्ये अख्खा संघ बाद!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ब्रिजटाऊनमध्ये सुरू झालेल्या यजमान वेस्ट इंडिज क्रिकेट संघ आणि जगातील अव्वल कसोटी संघ ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा खेळ उघडकीस आला. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करल्यानंतर त्यांच्यात सुधारणा होण्याची अपेक्षा होती पण नेमके उलट घडले.

advertisement
advertisement
सर्वप्रथम, ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या चार फलंदाजांपैकी 3 फलंदाजांच्या विकेट एकूण 22 धावांच्या आत पडल्या. सॅम कॉन्स्टास 3 धावा, कॅमेरॉन ग्रीन 3 धावा आणि जोश इंग्लिस 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. तिघांनाही वेस्ट इंडिजच्या दोन वेगवान गोलंदाज शमार जोसेफ आणि जेडेन सील्सच्या गोलंदाजीचा सामना करावा लागला.
advertisement
advertisement
advertisement
दरम्यान, ट्रॅव्हिस हेड हा एकमेव फलंदाज होता जो काही काळ खेळपट्टीवर राहिला आणि त्याने 59 धावा केल्या. डावाच्या शेवटच्या क्षणी कर्णधार पॅट कमिन्सनेही 18 चेंडूत 28 धावा करून काहीसा दिलासा दिला, अन्यथा ऑस्ट्रेलियाची स्थिती आणखी वाईट झाली असती, त्यांचा संघ 100 पेक्षा कमी धावांपर्यंत मर्यादित राहू शकला असता.
advertisement
ऑस्ट्रेलियाला 180 धावांवर रोखण्याचे काम फक्त दोन वेगवान गोलंदाजांनी केले. जेडेन सील्सने 15.5 षटकांत 60 धावा देत 5 बळी घेतले. तर शमार जोसेफने 16 षटकांत 46 धावा देत 4 बळी घेतले. त्याच वेळी, वेगवान गोलंदाज जस्टिन ग्रीव्हजला एक बळी मिळाला. तब्बल 30 वर्षांनंतर असं घडलं आहे, जेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वात कमी धावसंख्या उभारली.