Team India : ऋषभ पंतचा पत्ता कट! टीम इंडियाचा दुसरा विकेट कीपर कोण? एका जागेसाठी तिघांमध्ये रेस
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी शनिवारी टीम इंडियाची घोषणा होणार आहे. या सीरिजसाठी भारतीय टीममध्ये बदल होण्याची शक्यता आहे, पण सर्वाधिक चर्चा विकेट कीपिंगबद्दल सुरू आहे.
advertisement
advertisement
ऋषभ पंत 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय टीमचा भाग होता, पण टीम मॅनेजमेंटने केएल राहुलला पसंती दिल्याने पंतला संपूर्ण स्पर्धेत बेंचवरच बसावं लागलं. वनडे क्रिकेटमध्ये पंतला चांगली कामगिरी करता आलेली नाही. सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंतने 4 सामन्यांमध्ये फक्त 70 रन केल्या आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
संजू सॅमसनने डिसेंबर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतासाठी शेवटचे शतक झळकावले., पण त्यानंतर संजू एकही लिस्ट ए मॅच खेळलेला नाही. संजू मागच्या 2 वर्षांमध्ये भारताकडून एकही वनडे मॅच खेळलेला नाही, पण टी-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये त्याची निवड झाली आहे. वर्ल्ड कपच्या तयारीसाठी संजूला वनडे टीममध्ये संधी मिळणार का? असा प्रश्न आहे.









