रोहित शर्माने 1,298 sq ftचे लक्झरी अपार्टमेंट भाड्याने दिले; प्रत्येक महिन्याला होणार इतक्या लाखांची कमाई!
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Rohit Sharma Apartment: भारताचा कर्णधार रोहित शर्माने मुंबईच्या लोअर परेल परिसरातील अपार्टमेंट भाड्याने दिले आहे. यासाठी रोहितला प्रत्येक महिन्याला 2.6 लाख रुपये भाडे मिळणार आहे.
advertisement
दरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. रोहित शर्माने मुंबईच्या लोअर परेल भागातील आपले एक आलिशान अपार्टमेंट भाड्याने दिले आहे. जानेवारी 2025 मध्ये झालेल्या या करारानुसार त्याला दरमहा 2.6 लाख रुपये भाडे मिळणार आहे. ही माहिती प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रातून समोर आली आहे.
advertisement
रोहित शर्मा आणि त्याचे वडील गुरुनाथ शर्मा यांनी मार्च 2013 मध्ये हे अपार्टमेंट 5.46 कोटींना खरेदी केले होते. सध्या या प्रॉपर्टीवर 6% रेंटल यील्ड मिळत असल्याचे स्क्वायर यार्ड्सच्या अहवालात नमूद केले आहे. लोअर परेल हा मुंबईतील एक महत्त्वाचा रहिवासी आणि व्यावसायिक परिसर असून, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि नरीमन पॉइंटसारख्या व्यावसायिक केंद्रांपासून अगदी जवळ आहे.
advertisement
आलिशान सुविधांनी युक्त अपार्टमेंट: रोहितचे हे अपार्टमेंट लोढा मार्कीज - द पार्क या लोढा ग्रुपच्या 7 एकरांत पसरलेल्या लक्झरी प्रोजेक्टमध्ये आहे. या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया 1,298 चौरस फूट असून, त्याला दोन कार पार्किंग स्पेस देखील आहेत. येथे स्विमिंग पूल, जिम, क्लब हाऊस, मुलांसाठी खेळण्याचा एरिया आणि 24 तास सुरक्षा व्यवस्था यासारख्या सुविधांचा समावेश आहे. या लीज ट्रान्झॅक्शनसाठी 16,300 रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 1,000 रुपये नोंदणी शुल्क भरावे लागले.
advertisement
advertisement