advertisement

Shama Mohamed : 'रोहित' नाम तो सुना होगा… शमा मोहम्मदची पीछेहाट, यू-टर्न घेत केलं कॅप्टन रोहितचं अभिनंदन

Last Updated:
Shama Mohamed Tweet : भारताने न्यूझीलंडला हरवून तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी इंडिया टीम कॅप्टन रोहित शर्माबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होत, तो लठ्ठ आहे आणि त्याला वजन कमी करायची गरज आहे असं त्या म्हणाल्या होत्या पण आता यांनी या विधानापासून यू-टर्न घेत टीम इंडिया आणि रोहितचं अभिनंदन केलं आहे.
1/7
भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला आणि एकूण तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.

2/7
कर्णधार म्हणून रोहित शर्माचे हे दुसरे आयसीसी जेतेपद होते. याआधी, रोहितने 2024 च्या टी-20 विश्वचषकातही टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता.

3/7
दुसरीकडे, या विजयानंतर, माजी खेळाडूंसह क्रिकेट जगत कर्णधार रोहितचे अभिनंदन आणि शुभेच्छा देताना दिसत आहे. आणि आता त्यात एक नवीन नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद.

4/7
ही तीच शमा मोहम्मद आहे जिने 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान रोहित शर्माला लठ्ठ म्हटले होते.

5/7
भारतीय क्रिकेट संघाच्या विजयानंतर, काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्टद्वारे म्हटले आहे - चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकण्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन.

6/7
संघाचे नेतृत्व करणाऱ्या आणि 76 धावांची शानदार खेळी करणाऱ्या रोहित शर्माला सलाम. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनीही महत्त्वपूर्ण खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. नेहमीच लक्षात राहील असा विजय.

7/7
दुसरीकडे, हे ट्विट पोस्ट केल्यानंतर ती चाहत्यांचे लक्ष्य बनली आहे. तिच्या या पोस्टवर भारतीय क्रिकेट चाहते तीव्र प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. कारण ही  तीच व्यक्ती आहे जिने रोहित शर्माला त्याच्या शरीरयष्टीमुळे जाड म्हटले होते. पण आता तिने तिच्या विधानापासून यु-टर्न घेत रोहित आणि टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement