तिकीटासाठी राष्ट्रवादीत आले, दोन वर्षांत शरद पवारांना बाय-बाय, मुश्रीफांचा कट्टर विरोधक पुन्हा भाजपमध्ये!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित समरजीत घाटगे येत्या ८ तारखेला भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे.
तुषार रूपनवर, प्रतिनिधी, मुंबई : विधानसभा निवडणुकीला भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले समरजित घाटगे पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. येत्या ८ तारखेला ते भारतीय जनता पक्षात प्रवेश अधिकृतरित्या प्रवेश करतील.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी पिछेहाट झाली. एकेकाळी पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा जोर असायचा. मात्र बदलेल्या राजकारणाच्या परिस्थितीत या पट्ट्यात राष्ट्रवादीला मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे पक्षाला एकामागून एक धक्के बसत आहेत. हसन मुश्रीफ यांच्याविरोधात निवडून येण्यात समरजित घाटगे यांना अपयश आल्याने राष्ट्रवादीत राहण्याबाबत त्यांच्या मनात किंतू परंतु होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरताच भाजपमध्ये प्रवेश करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.
advertisement
मुश्रीफांचा कट्टर विरोधक पुन्हा भाजपमध्ये!
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित समरजीत घाटगे येत्या ८ तारखेला भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. प्रवेश करण्याआधीही त्यांनी भाजपच्या बैठकांना हजेरी लावली होती. तसेच भाजप नेत्यांच्या नेहमीप्रमाणे भेटीगाठीही ते घेत होते. कागल नगर परिषद निवडणुकीत मुश्रीफ-घाटगे एकत्र आल्याची संपूर्ण राज्यभरात चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची केवळ चर्चा सुरू असून कोणताही निर्णय होत नसल्याने भविष्यातल्या संधी ओळखून त्यांनी पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
advertisement
कोण आहेत समरजित घाटगे?
समरजित घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे नेते आहेत
विधानसभेला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता
आता पुन्हा ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत
हसन मुश्रीफ यांच्याविरोधात निवडणूक जिंकण्यात त्यांना अपयश आले
हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची ओळख आहे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 7:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तिकीटासाठी राष्ट्रवादीत आले, दोन वर्षांत शरद पवारांना बाय-बाय, मुश्रीफांचा कट्टर विरोधक पुन्हा भाजपमध्ये!








