स्वस्त साहित्य विकून DMart कसं मिळवतं एवढा नफा? त्यामागचं 'हे' आहे खरं गुपित; ऐकून तुम्हीही व्हाल चकित
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
डीमार्ट हे आज देशातील सर्वात स्वस्त आणि विश्वासार्ह रिटेल ब्रँड मानलं जातं. राधाकिशन डॅमानी यांचं शिक्षण फक्त बारावीपर्यंत झालं असलं, तरी त्यांची व्यावसायिक बुद्धिमत्ता अफाट आहे. त्यांनी...
डीमार्ट (DMart) संपूर्ण भारतात स्वस्त वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. नव्याने विकसित होणाऱ्या शहरांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत, डीमार्ट सगळीकडे आहे. डीमार्टची ओळख इतकी वाढली आहे की स्वस्त वस्तू म्हणजे डीमार्ट, असंच मानलं जातं. देशातील अनेक मध्यमवर्गीय कुटुंब आज त्यांच्या महिन्याचं राशन डीमार्टमधूनच खरेदी करतात. इतकंच काय, पण रोजच्या वापराचे कपडे आणि किचनमधील वस्तू सुद्धा लोक डीमार्टमधून घेतात.
advertisement
आजच्या ऑनलाईनच्या जमान्यात सुद्धा डीमार्ट अनेक मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सना टक्कर देत आहे. याचं कारण स्पष्ट आहे – इथे वस्तू खूप स्वस्त दरात मिळतात. एक मजेदार गोष्ट म्हणजे ज्या भागात डीमार्ट उघडतं, तिथल्या जमिनीच्या किमती वाढायला लागतात. लोकांना वाटतं की डीमार्टने ज्या भागात गुंतवणूक केली आहे, त्या भागाचं भविष्य चांगलं असणार.
advertisement
डीमार्टच्या यशामागे ज्या व्यक्तीची बुद्धी आहे, ते आहेत राधाकिशन दमानी. हे तेच व्यक्ती आहेत ज्यांना दिवंगत दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आपले मार्गदर्शक मानत होते. राधाकिशन दमानी देशातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत समाविष्ट आहेत. त्यांची संपत्ती 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की राधाकिशन दमानी फक्त 12 वी पर्यंत शिकलेले आहेत. तरीही, आपल्या तल्लख बुद्धी आणि व्यावसायिक दृष्टिकोनाच्या बळावर आज ते अब्जावधींच्या संपत्तीचे मालक आहेत.
advertisement
advertisement
2002 मध्ये त्यांनी मुंबईत पहिलं डीमार्ट स्टोअर उघडलं. त्यांनी ठरवलं होतं की ते भाड्याच्या जागेत डीमार्ट स्टोअर उघडणार नाहीत. आज देशभरात डीमार्टचे 300 हून अधिक स्टोअर्स आहेत. याचा अर्थ राधाकिशन दमानी यांच्या मालकीचे केवळ डीमार्ट स्टोअर्सच नाहीत, तर भारतात 300 मोठ्या जमिनी सुद्धा आहेत. हे स्टोअर्स 11 राज्यांमध्ये पसरलेले आहेत.
advertisement
जिथेपर्यंत स्वस्त वस्तू विकण्याचा प्रश्न आहे, त्याचा संबंध सुद्धा राधाकिशन दमानी यांच्या वैयक्तिक धोरणांशी आहे. डीमार्ट भाड्याच्या जागेत स्टोअर उघडत नाही, ज्यामुळे त्यांचा चालण्याचा खर्च खूप कमी होतो. ते स्वतःच्या जमिनीवर स्टोअर चालवतात, त्यामुळे त्यांना नियमित भाडं द्यावं लागत नाही. या बचतीचा फायदा ते ग्राहकांना स्वस्त वस्तू देऊन करतात.
advertisement
डीमार्ट आपला स्टॉक 30 दिवसांच्या आत विकून टाकतो आणि नवीन वस्तूंची ऑर्डर देतो. यामुळे त्यांना मोठा डिस्काउंट मिळतो. लोकांना आकर्षित करण्यासाठी डिस्काउंटपेक्षा चांगली गोष्ट दुसरी कोणती असू शकत नाही. डीमार्ट ज्या कंपन्यांकडून वस्तू खरेदी करतं, त्यांना त्वरित पैसे देतं. पैसे लगेच मिळत असल्यामुळे उत्पादक त्यांना आणखी डिस्काउंट देतात. डीमार्ट हा डिस्काउंट ग्राहकांना देतो किंवा स्वतःचा नफा वाढवण्यासाठी वापरतो. एकूणच, उत्पादक कंपनीकडून जो डिस्काउंट मिळतो, तो ग्राहकांना दिला जातो. ते स्वतःच्या खिशातून काहीही देत नाहीत, त्यांचा नफा आहे तेवढाच राहतो.
advertisement
याशिवाय, काही कंपन्या आपल्या उत्पादनांना चांगल्या प्रकारे मांडण्यासाठी डीमार्टला जास्त डिस्काउंट देतात किंवा थेट पेमेंट सुद्धा करतात. रॅक मध्ये खूप वर किंवा खूप खाली ठेवलेला माल सहसा ग्राहक बघत नाही किंवा खरेदी करत नाही. त्यांच्या डोळ्यासमोर ठेवलेला माल त्यांना जास्त आकर्षित करतो. त्यामुळे एकूणच डीमार्ट आपल्या स्टोअरमधील चांगली जागा विकून पैसे कमावतं. डीमार्ट आपल्या खर्चात 5-7 टक्के बचत करतं आणि तो डिस्काउंटच्या रूपात ग्राहकांना देतं. याच कारणामुळे डीमार्ट आजही भारतातील सर्वात स्वस्त आणि विश्वासार्ह रिटेल चेन आहे.