व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचे सत्य साई बाबांशी डायरेक्ट कनेक्शन, निमंत्रणपत्रिकांवर ‘ॐ’ चिन्ह; अटकेआधी दिले निवेदन
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Venezuelan president and Sathya Sai Baba: व्हेनेझुएलाचे अपदस्थ राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या आयुष्यातील राजकारणाइतकाच चर्चेत असलेला एक पैलू म्हणजे भारताशी जोडलेली त्यांची आध्यात्मिक नाळ. सत्य साई बाबांवरील श्रद्धा, पत्नी सिलीया फ्लोरेस यांचा प्रभाव आणि सत्तेच्या शिखरावर असूनही जपलेला हा आध्यात्मिक संबंध, अटकेनंतर पुन्हा एकदा जागतिक चर्चेचा विषय ठरला आहे.
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचे भारताशी एक अनपेक्षित पण खोल नातं आहे. आंतरराष्ट्रीय निर्बंध, राजकीय दडपशाही आणि सत्तासंघर्ष सुरू होण्याच्या कित्येक वर्षांआधी मादुरो यांनी भारतात आपला आध्यात्मिक आधार शोधला होता, तोही त्यांच्या पत्नी सिलीया फ्लोरेस यांच्या माध्यमातून. अमेरिकेच्या वाढत्या दबावानंतर मादुरो यांना अटक करण्यात आली आणि पत्नी सिलीया फ्लोरेस यांच्यासह त्यांना वेनेजुएलाबाहेर नेण्यात आले, तेव्हा या आध्यात्मिक पार्श्वभूमीची पुन्हा चर्चा सुरू झाली.
advertisement
निकोलस मादुरो आणि सिलीया फ्लोरेस दोघेही सत्य साई बाबांचे अनुयायी होते. कॅथोलिक कुटुंबात वाढलेले मादुरो, विवाहापूर्वीच सिलीया फ्लोरेस यांच्या ओळखीमुळे सत्य साई बाबांच्या विचारांशी जोडले गेले. 2005 साली दोघांनी आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी परिसरात असलेल्या प्रशांती निलयम आश्रमाला भेट दिली होती. यावेळी सत्य साई बाबांसोबत खासगी भेटही झाली होती.
advertisement
advertisement
मादुरो राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मिराफ्लोरेस पॅलेसमधील त्यांच्या खासगी कार्यालयात सायमन बोलिव्हार आणि ह्यूगो चाव्हेझ यांच्या प्रतिमांसोबत सत्य साई बाबांचे छायाचित्र लावण्यात आल्याचेही अहवाल सांगतात. 2011 मध्ये सत्य साई बाबांचे निधन झाल्यानंतर, त्या वेळी वेनेजुएलाचे परराष्ट्र मंत्री असलेल्या मादुरो यांनी अधिकृत शोकप्रस्ताव मांडण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेनेजुएलाच्या नॅशनल असेंब्लीने सत्य साई बाबांच्या “मानवतेसाठीच्या आध्यात्मिक योगदानाची” दखल घेत अधिकृत शोकप्रस्ताव मंजूर केला आणि देशभरात राष्ट्रीय शोकदिन जाहीर करण्यात आला.
advertisement
मादुरो यांच्या सत्ताकाळात, अनेक परदेशी संस्था वेनेजुएलातून हाकलल्या गेल्या असताना देखील सत्य साई संघटनेचे कार्य देशात सुरू राहिले. लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठ्या सत्य साई भक्त समुदायांपैकी एक वेनेजुएलात असून, त्याची मुळे 1974 पर्यंत जातात. 2024 मध्ये वेनेजुएलाच्या राष्ट्रीय दिनाच्या निमंत्रणपत्रिकांवर ‘ॐ’ या चिन्हाचा वापर करण्यात आला होता, याकडेही आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी लक्ष वेधले होते.
advertisement
नोव्हेंबर 2025 मध्ये अटक होण्याच्या काही महिन्यांपूर्वीच मादुरो यांनी राजकीय भाषणांपासून दूर जात सत्य साई बाबांच्या जन्मशताब्दी निमित्त अधिकृत निवेदन जारी केले होते. त्यात त्यांनी सत्य साई बाबांना “प्रकाशस्वरूप व्यक्तिमत्त्व” असे संबोधले होते. “आपण जेव्हा भेटलो, ते क्षण मला नेहमी आठवतात… या महान गुरूंचे ज्ञान आम्हाला सतत मार्गदर्शन करत राहो,” असे मादुरो यांनी त्या वेळी म्हटले होते.
advertisement
23 नोव्हेंबर 1962 रोजी कामगार कुटुंबात जन्मलेले निकोलस मादुरो हे ट्रेड युनियन नेत्याचे पुत्र आहेत. 1992 मध्ये लष्करी अधिकारी ह्यूगो चाव्हेझ यांनी अपयशी उठाव केला, त्या काळात मादुरो बसचालक म्हणून काम करत होते. चाव्हेझ यांची सुटका व्हावी यासाठी त्यांनी आंदोलन केले आणि समाजवादावर आधारित त्यांच्या राजकीय विचारसरणीचे समर्थन केले, त्या काळात समाजवाद जागतिक पातळीवर अप्रिय मानला जात होता.
advertisement
1998 मध्ये चाव्हेझ सत्तेत आल्यानंतर मादुरो संसदेत निवडून गेले. पुढील अनेक वर्षे त्यांनी अमेरिकेच्या लॅटिन अमेरिकेतील हस्तक्षेपाविरोधात चाव्हेझ यांच्या तथाकथित ‘क्रांती’चा पुरस्कार केला. विरोधकांनी त्यांच्या कामगारवर्गीय पार्श्वभूमीवर टीका करत त्यांना अनुभवहीन आणि चाव्हेझ यांची अंधानुकरण करणारा नेता ठरवण्याचा प्रयत्न केला.
advertisement
advertisement
2013 मध्ये कर्करोगामुळे चाव्हेझ यांचे निधन झाल्यानंतर मादुरो अल्प फरकाने राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. मात्र चाव्हेझ यांच्या करिष्म्याच्या तुलनेत मादुरो यांची लोकप्रियता कमी ठरली. त्यांच्या सत्ताकाळात अन्नधान्याची टंचाई, रांगा आणि महागाईने देश हादरला. तेलबूम संपल्यानंतरही चाव्हेझ काळातील अनुदाने कमी न करण्याचा निर्णय त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरला.
advertisement
महागाई वाढल्यानंतर मादुरो यांनी सैनिकांना दुकाने ताब्यात घेण्याचे आदेश दिले आणि घरगुती उपकरणे अत्यल्प दरात विकण्यास भाग पाडले. यामुळे महापालिका निवडणुकांपूर्वी त्यांची लोकप्रियता काही प्रमाणात वाढली. 2018 मध्ये कॅराकासमधील एका सभेदरम्यान स्फोटक ड्रोनद्वारे त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर मादुरो यांनी सार्वजनिक कार्यक्रमांतील उपस्थिती कमी केली आणि थेट प्रक्षेपण मर्यादित केले.
advertisement
या संपूर्ण कारकिर्दीत त्यांच्या पत्नी सिलीया फ्लोरेस कायम त्यांच्या सोबत दिसत राहिल्या. त्यांनी अ‍ॅटर्नी जनरल, संसदेच्या प्रमुख अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आणि त्या मादुरो यांच्याइतकीच प्रभावशाली मानल्या जात होत्या. अखेर शनिवारी माजी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मादुरो आणि फ्लोरेस यांना अटक करून देशाबाहेर नेण्यात आल्याची माहिती दिली आणि व्हेनेझुएलाच्या राजकारणातील एक वादळी पर्व संपल्याचे चित्र स्पष्ट झाले.










