Vande Bharat: भारतातल्या 5 वेगवान वंदे भारत एक्सप्रेस, चित्त्याला मागे टाकतील एवढा जबरदस्त वेग
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
वंदे भारत एक्सप्रेसला भारतातील सर्वात वेगवान ट्रेन मानलं जातं. हीच सर्वात बेस्ट ट्रेन आहे असं म्हणतात. तुम्हाला माहितीये का, देशभरात धावणाऱ्या सर्व वंदे भारत एक्सप्रेसच्या स्पीडमध्ये फरक आहे. आज आपण जाणून घेणार आहोत देशातल्या टॉप 5 फास्टेस्ट वंदे भारत एक्सप्रेसबाबत. (शाश्वत सिंह, प्रतिनिधी / झाँसी)
नवी दिल्लीपासून वाराणसीपर्यंत धावणारी वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन नंबर-22436) ही प्रचंड वेगवान आहे. दिल्ली ते वाराणसी हे 771 किलोमीटरचं अंतर ही एक्सप्रेस 8 तासांमध्ये पार करते. या ट्रेनचा वेग आहे साधारण 96.37 किलोमीटर प्रतितास.
advertisement
हजरत निजामुद्दीनपासून रानी कमलापती रेल्वे स्टेशनपर्यंत धावणारी वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन नंबर-20172) 700 किलोमीटर अंतर 7 तास 30 मिनिटांमध्ये पार करते. या ट्रेनचा वेग आहे साधारण 95.89 किलोमीटर प्रतितास.
advertisement
चेन्नईपासून कोयंबटूरला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन नंबर- 20643) 497 किलोमीटर अंतर 5 तास 50 मिनिटांत पार करते. या ट्रेनचा वेग आहे साधारण 90.36 किलोमीटर प्रतितास.
advertisement
सिकंदराबादहून विशाखापट्टणमला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन नंबर-20707) 699 किलोमीटर अंतर 8 तास 30 मिनिटांत पार करते. या ट्रेनचा वेग आहे साधारण 84.21 किलोमीटर प्रतितास.
advertisement
हिमाचल प्रदेशला जाणारी वंदे भारत दिल्ली ते अंब अंदौरा एक्सप्रेस 437 किलोमीटरचं अंतर 5 तास 15 मिनिटांत पार करते. या ट्रेनचा वेग आहे साधारण 84.85 किलोमीटर प्रतितास.