रात्री येतो रडण्याचा आवाज, सकाळी भिंतीवर दिसतात खुणा...आजवर उलगडलं नाही कोडं PHOTOS
- Published by:Isha Jagtap
 - local18
 
Last Updated:
आजूबाजूला भूत आहे, असे भास अनेकजणांना झाले असतील. परंतु नेमका 'हाच' भूत आहे, असं ठोस सांगण्यासारखा भूत आजवर कोणी पाहिलेला नसेल. त्यामुळे भूत खरोखर असतो का, याचं उत्तर आपल्याला माहित नाही. मात्र तरीही त्याच्या नुसत्या नावानेच आपली बोबडी वळते. कधीकधी आपण इंटरनेटवर 'The most haunted places?' असं सर्च करतो. तुम्हालाही भुतांबाबत फार कुतूहल वाटत असेल. तर ही बातमी शेवटपर्यंत वाचा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दुलारी भवन वर्षानुवर्षे बंद आहे. ते उघडण्याची कोणी हिंमतही करत नाही. मात्र या भवनाच्या भिंतीवर उलट्या हाता-पायांच्या खुणा दिसतात. स्थानिक लोक सांगतात की, या खुणा रक्ताच्या आहेत. शिवाय अनेकजणांना याठिकाणी संध्याकाळच्या सुमारास किंकाळ्या आणि रडण्याचे आवाज ऐकू येतात. त्यामुळे घराबाहेर पडण्याची रिस्क कोणी घेतच नाही. परंतु आपण फार धाडसी असाल, तर दुलारी भवनाला भेट देऊ शकता. संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी इथं जाण्याचा अनुभव फार रोमांचक असेल.


