इतक्या पैशांचं केलंस काय? नवऱ्याने बायकोकडे हिशोब मागितला तर...; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

Last Updated:
Husband Wife Fight : पतीने घरखर्चाचा हिशोब मागितला म्हणून पत्नीने एफआयआर दाखल केली. एफआयआर रद्द करण्यासाठी पतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पती-पत्नीमधील पैशांच्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
1/5
अरे! 5000 रुपये होते, संपलेसुद्धा.... इतक्या पैशांचं केलंस काय? इतकं काय घेतलंस? कुठे खर्च केलेस? कित्येक घरात नवरा बायकोला हमखास विचारत असलेले हे प्रश्न... बायकोकडे नवऱ्याने पैशांच्या खर्चाचा हिशोब मागणं... अशाच एका नवऱ्याने त्याच्या बायकोकडे हिशोब मागितला म्हणून बायकोने एफआयर दाखल केला. पतीने याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल द्यावा लागला.

advertisement
2/5
पत्नीने तिच्या पतीवर अनेक आरोप लावले होते, ज्यात त्याच्या पालकांना पैसे पाठवणं, दैनंदिन खर्चाची नोंद करण्यासाठी एक्सेल शीट ठेवणं, प्रसूतीनंतर वाढलेल्या वजनाबद्दल सतत टोमणे मारणे आणि प्रेग्नन्सीत आणि डिलीव्हरीनंतर काळजी न घेणं यांचा समावेश होता. न्यायालयाने हे आरोप क्रूरतेच्या व्याख्येत बसत नाहीत असं आढळलं.

3/5
कोर्टाने म्हटलं कुटुंबाला पैसे पाठवणं हे फौजदारी खटल्याला पात्र कृत्य नाही. गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर पतीने काळजी न घेणं आणि वजनाबद्दल टोमणे मारणं प्रथमदर्शनी मान्य केले असले तरी, पतीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात पण ते क्रूरतेचं प्रमाण असू शकत नाही ज्यासाठी खटल्याच्या प्रक्रियेतून जावं लागतं.

4/5
पतीने पत्नीला सर्व खर्चाची एक्सेल शीट ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप वरवर पाहता स्वीकारला गेला तरी तो क्रूरता असू शकत नाही. ही परिस्थिती भारतीय समाजाचे प्रतिबिंब आहे, जिथं घरातील पुरुष अनेकदा आर्थिक बाबींवर वर्चस्व गाजवण्याचा आणि महिलांच्या संपत्तीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकरणांमुळे वैवाहिक जीवनातील दैनंदिन त्रास दिसून येतो, ज्याला क्रूरता म्हणता येणार नाही. विशेषतः जेव्हा कोणतेही ठोस मानसिक किंवा शारीरिक नुकसान सिद्ध झालेलं नाही.

5/5
सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं एफआयआरचं साधं निरीक्षण केल्यास असं दिसून येतं की आरोप अस्पष्ट आणि सामान्य आहेत. पत्नीने छळाच्या कोणत्याही विशिष्ट घटनेचे कोणतेही ठोस तपशील किंवा पुरावे दिले नाहीत न्यायालयाने पतीची याचिका स्वीकारली आणि पत्नीने दाखल केलेला एफआयआर फेटाळून लावला. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)

Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement