Budget 2025 Nirmala sitharaman saree : साधी नाही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची साडी! बजेटशी खास कनेक्शन, काय सांगतो रंग?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Budget 2025 Nirmala sitharaman saree : अर्थमंत्री निर्मला सीतारमण दरवर्षी प्रमाणे बजेट सादर करणार आहे. सगळ्या देशाचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे आहे . पण यासोबतच निर्मला सीतारमण यांची साडीही चर्चेत असते.
advertisement
नीर्मला सीतारमण यांनी फायनान्स मिनिस्टर झाल्यानंतर 2019 साली पहिल्याच बजेटला गुलाबी रंगाची आणि सोनेरी बॉर्डरची साडी नेसली होती. या साडीला मंगलागिरी साडी असं म्हणतात. गुलाबी रंग स्थिरता आणि गंभीरता दर्शवतं. स्थिरता जी विकासदरात दिसली. 2019 मध्ये 3.87 टक्के होती 2023 मध्ये ती वाढून 7.3 टक्क्यांवर पोहोचली.
advertisement
"2020 च्या दुसऱ्या बजेटला निर्मला सीतारमण यांनी नेसलेली पिवळ्या-सोनेरी रंगाची सिल्क साडी देखील खूपच चर्चेत होती. या साडीला आकाशी रंगाची हलकी बॉर्डर आहे. भारतीय परंपरा आणि शास्त्रांमध्ये पिवळा रंग शुभ मानला जातो. याशिवाय रंगांची खासियत बघितली तर पिवळा रंग समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे. 2020 वर्ष कोरोना महासाथीचं. अशा परिस्थितीत, पिवळ्या साडीत देशात लाल खाती प्रत्येकासाठी समृद्धी आणू शकते, असा विश्वास होता. नवीन उर्जा, चांगलं भविष्य याचा विश्वास त्यांनी दिला.
advertisement
2021 च्या बजेटला त्या लाल रंगाची पोचमपल्ली साडी नेसल्या होत्या. असे मानले जाते की अर्थमंत्री सीतारामन अनेकदा महत्त्वाच्या दिवशी लाल साडी नेसतात. भारतीय परंपरेत लाल रंग हा शक्ती, ऊर्जा आणि प्रेमाचा रंग मानला जातो. हा अधिकाराचा रंग देखील आहे आणि त्वरित आकर्षित करणारा देखील आहे. हा रंग नेहमीच सामर्थ्य आणि आत्मविश्वासाशी संबंधित आहे.
advertisement
2022मध्ये त्यांची साडी पारंपारिक दक्षिण भारतीय शैलीत मरून आणि केशरी रंगाची होती. ज्यामध्ये मरून रंगाची बॉर्डर होती आणि मधला भाग नारंगी होता. या साडीला चंदेरी रंगाची बॉर्डर होती. ही साडी ओडीसाची असल्याचं सांगितलं जातं. या साडीला बोमकाई किंवा सोनपुरी साडी असं देखील म्हणतात. ही साडी त्यांच्या आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्वाला वेगळा रंग देत होती. केशरी रंग लाल आणि पिवळ्या रंगाचे मिश्रण आहे. लाल रंग आपल्याला दृढनिश्चय देतो. पिवळ्या रंगामुळे सात्विक प्रवृत्तीचा विकास होतो. जिथे भगवा रंग हा भाजपचा रंग मानला जातो, तिथे तो हिंदुत्वाशी निगडित पवित्र रंग मानला जातो. मरून रंगाचा अर्थ स्थिरता आणि शक्ती. याचवर्षी आर्थिकरित्या आपला देश अधिक मजबूत झाला आणि जगातील सगळ्यात मोठी पाचवी अर्थव्यवस्था बनला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement