सामान्यपणे लग्नासाठी मुलगी पाहताना सर्वात आधी पाहतात ते ती कशी दिसते. आपली होणारी बायको सुंदर असावी असं अनेक पुरुषांना वाटतं. पण आयुष्याची जोडीदार निवडताना खूप काळजी घ्यावी. फक्त सौंदर्य पाहून जोडीदाराची निवड करू नये. पण आचार्य चाणक्य यांनी सुंदर महिलेशी लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे. चाणक्यनीतीमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. चाणक्य यांच्या मते, अशी महिला जी सुंदर आहे ती बुद्धिमानही असेल हे सांगू शकत नाही. त्यामुळे लग्न चांगले विचार असलेल्या महिलेशी करा, सुंदर दिसणाऱ्या नव्हे, असं चाणक्य म्हणाले.