JCB कितीला मिळतो? कोण विकत घेऊ शकतो? चालवायला वेगळं लायसन्स लागतं का? संपूर्ण माहिती
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सर्वसामान्यांना या संदर्भात काही कॉमन प्रश्न पडतात, ते म्हणजे JCB किंवा बुलडोजरची किंमत नक्की किती असते? कोण विकत घेऊ शकतो? आणि हे चालवण्यासाठी वेगळं लायसन्स लागतं का? चला याच प्रश्नाची उत्तरं सविस्तर जाणून घेऊ.
आजच्या बांधकाम क्षेत्रात JCB, बुलडोजर, एक्स्कॅव्हेटर, बॅकहो लोडर अशी भारी यंत्रं पाहायला मिळतात. रस्ते बांधकाम, प्लॉट लेव्हलिंग, फार्महाऊस डेव्हलपमेंट, डोंगर कापकाम, खड्डे खोदकाम किंवा मोठ्या प्रोजेक्टचं काम असो… अशी यंत्रं कामाला अफाट गती देतात. पण सर्वसामान्यांना या संदर्भात काही कॉमन प्रश्न पडतात, ते म्हणजे JCB किंवा बुलडोजरची किंमत नक्की किती असते? कोण विकत घेऊ शकतो? आणि हे चालवण्यासाठी वेगळं लायसन्स लागतं का? चला याच प्रश्नाची उत्तरं सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
JCB / बुलडोजरची किंमत किती असते?भारतात JCB किंवा बुलडोजरची किंमत मॉडेल, क्षमतेनुसार आणि कंपनीनुसार बदलते. साधारण श्रेणी अशी दिसते:-बॅकहो लोडर (JCB 3DX सारखे): ₹28 लाख ते ₹38 लाख-मिनी एक्स्कॅव्हेटर: ₹18 लाख ते ₹28 लाख-मध्यम क्षमता एक्स्कॅव्हेटर: ₹40 लाख ते ₹65 लाख-हाय-एन्ड बुलडोजर / हेवी एक्स्कॅव्हेटर: ₹75 लाख ते ₹1.5 कोटींपर्यंत
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
JCB आणि बुलडोजर ही महागडी पण अत्यंत उपयुक्त मशीनरी असून बांधकाम क्षेत्रात त्यांची मागणी प्रचंड आहे. कोणत्याही सामान्य व्यक्तीला हे मशीन विकत घेणं पूर्णपणे कायदेशीर आहे; मात्र, ते चालवण्यासाठी प्रशिक्षित आणि लायसन्सधारक ऑपरेटर लागतो. योग्य मॉडेल, फायनान्सिंग आणि अनुभवी ऑपरेटर मिळाला तर हे यंत्र काही वर्षांतच चांगला रिटर्न देतं.


