Jeans मधला ‘तो’ छोटूसा पॉकेट कशासाठी? 90% लोकांना याबद्दल चुकीची माहिती
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आता तुमच्या मनात नक्कीच उत्सुकता वाढली असेल की असं का आहे त्यात? चला सविस्तर जाणून घेऊ.
जीन्स (Jeans) हा आजच्या फॅशनचा आणि दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मग ते पुरुष असोत किंवा महिला, लहान मुलं असोत किंवा कोणी वृद्ध, सगळेच हल्ली जीन्स वापरु लागले आहेत. लोक आपल्या आवडीप्रमाणे कधी पेन्सिल, कधी लूज, कधी मॉम फिट तर कधी फ्लेअर जीन्स वापरतात. जीन्समध्ये पॉकेट जिन्स देखील असते. आपण तिच्यावर असलेल्या वेगवेगळ्या पॉकेट्सला नक्कीच पाहिलं असेल.
advertisement
पण जीन्सच्या उजव्या बाजूच्या मोठ्या पॉकेटमध्ये असलेले, अत्यंत लहान पॉकेट (Small Pocket) आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. सोशल मीडियावर बऱ्याच काळापासून हा प्रश्न फिरत आहे की या लहान पॉकेटचा खरा उपयोग काय आहे? अनेकांना वाटते की ते नाणी ठेवण्यासाठी आहे, तर काही लोक त्याला केवळ 'डिझाइन' मानतात. पण या पॉकेटचा इतिहास थेट 19 व्या शतकाशी जोडलेला आहे आणि तो जीन्सच्या जन्मकथेचा एक महत्त्वाचा भाग आहे.
advertisement
आता तुमच्या मनात नक्कीच उत्सुकता वाढली असेल की असं का आहे त्यात? चला सविस्तर जाणून घेऊ.जीन्सचा शोध लागला तो 19 व्या शतकात, जेव्हा लेव्ही स्ट्रॉस (Levi Strauss) यांनी कामगार वर्गासाठी टिकाऊ आणि मजबूत कपड्यांचे डिझाइन केले. या काळात, आजच्यासारखी मनगटी घड्याळे (Wrist Watches) फारशी प्रचलित नव्हती. त्याऐवजी, पुरुष कामगार आणि व्यापारी चेन असलेली छोटी पॉकेट वॉच (Pocket Watch) वापरत असत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


