LPG किंवा CNG दोन्ही पण गॅसच, मग जेवण आणि वाहनांसाठी कोणतंही वापरलं तर चालतं का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आजच्या काळात, पर्यावरणास सर्वात कमी हानी करणारे आणि वापरायला अधिक सुरक्षित इंधन कोणते, हा प्रश्न प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचा झाला आहे. खास करून शहरांमध्ये प्रदूषणाचा स्तर वाढताना दिसत असताना. त्यातच घरात कोणता गॅस सुरक्षित? वाहनांसाठी कोणता गॅस योग्य? याबद्दल अनेकांच्या मनात गोंधळ असतो.
दररोजच्या जीवनात आपण किती गोष्टींमध्ये गॅसचा वापर करतो याचं आपण कधी शांत बसून निरीक्षण केलं आहे का? स्वयंपाकघरातील चुलीपासून ते रस्त्यावर धावणाऱ्या बस-ऑटोपर्यंत गॅस आपल्या भोवती सातत्याने वापरला जातो. पण या वापरामध्ये दोन नावं सतत ऐकू येतात. एलपीजी आणि सीएनजी दोन्ही ही इंधन असले तरी देखील त्याचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. या दोन्ही इंधनांची कथा, त्यांची रचना, त्यांचा स्वभाव आणि सुरक्षिततेचा स्तर पूर्णपणे वेगळा आहे.
advertisement
advertisement
advertisement
एलपीजी आणि सीएनजी:सीएनजी (Compressed Natural Gas) हा मुख्यतः मीथेन (CH₄) गॅस असतो, तो थेट नैसर्गिक वायूच्या (Natural Gas) साठ्यांमधून मिळतो.एलपीजी (Liquefied Petroleum Gas) मात्र प्रोपेन (C₃H₈) आणि ब्यूटेन (C₄H₁₀) या दोन गॅसचे मिश्रण असते. तेल शुद्धीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान (Refinery) मधून हा गॅस तयार होतो. पण दोन्ही इंधने दाबयुक्त सिलेंडरमध्ये ठेवली जातात, हे ऐकच साम्य आहे.
advertisement
advertisement
पण पर्यावरणाच्या दृष्टीने कोण 'जास्त चांगलं'?जर “ग्रीन इंधन” या निकषावर तुलना केली तर, सीएनजी सर्वात स्वच्छ इंधनांपैकी एक आहे. सीएनजी जळताना अतिशय कमी अवशेष निर्माण करते. शिवाय यामध्ये हवा दूषित करणारे कण जवळजवळ नसतातच. जगभरातील बस, टॅक्सी, सार्वजनिक वाहतूक यामध्ये सीएनजीचा वापर करण्यामागचं हेच प्रमुख कारण आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


