Road Lines : रस्त्यावरील पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या रेषा काय दर्शवतात? 90 टक्के लोकांना माहित नसेल उत्तर
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
तुम्ही गाडीने हायवेवरून जाताना किंवा रस्त्यावर चालताना सुद्धा पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या रेषा पाहिल्या असतील. यापैकी काही रेषा या सरळ, काही डबल तर काही तुटक, पिवळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या सुद्धा असतात. मात्र बऱ्याचदा या रेषा नेमक काय दर्शवतात हे माहित नसतं. तेव्हा रस्त्यावरील विविध प्रकारच्या रेषां मागचा नेमका अर्थ काय याविषयी जाणून घेऊयात.
जर रस्त्याच्या मधोमध तुम्हाला पांढऱ्या रंगाची एकसंध जाडसर रेषा दिसली. तर याचा अर्थ तुम्ही ही रेष ओलांडून पलीकडे जाऊ नये. पांढऱ्या एकसंध रेषेचा अर्थ तुम्ही ज्या लेनमधून गाडी चालवत आहात त्याच लेनमधून गाडी चालवा, संबंधित लेन ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये जाऊ नका असा याचा अर्थ होतो. जर ती लाईन क्रॉस करताना एखाद्या ट्राफीक पोलिसांने तुम्हाला पकडलं तर ते तुम्हाला फाईन मारु शकतात.
advertisement
advertisement
रस्त्याच्या मधोमध पिवळ्या रंगाची एकसंध रेष असेल तर तुम्ही गाडी चालवत असताना इतर वाहनांना ओव्हरटेक करू शकता असा याचा अर्थ असतो. परंतु असे करताना तुम्ही पिवळ्या रेषेच्या बाहेर जाऊ नये. पिवळ्या एकसंध रेशबाबत विविध राज्यांमध्ये वेगवेगळे नियम आहेत. तेलंगणा येथे पिवळी रेघ रस्त्यावर असताना, इतर गाड्यांना ओव्हरटेक करू नये असा संकेत असतो .
advertisement
advertisement








