World's Best Handwriting : खरंच मोत्यासारखं अक्षर! व्हायरल होतंय जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर, पण आहे कुणाचं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
World's Beautiful Handwriting : जगातील सुंदर हस्ताक्षर म्हणून काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे कॉम्प्युटरवर टाइप केल्यासारखं दिसतं, अशी टिप्पणी नेटिझन्सनी केली. तिचं हस्ताक्षर पाहून हस्तलेखन तज्ज्ञही आश्चर्य व्यक्त करत आहेत.
advertisement
advertisement
प्रकृती मल्ला असं या विद्यार्थिनीचं नाव. तिच्या सुंदर हस्ताक्षरामुळे ती चर्चेत आहे. प्रकृती आता 16 वर्षांची आहे. नेपाळ मधील सैनिक वस्य महाविद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे. प्रकृती मल्ला वयाच्या 14 व्या वर्षी तिच्या अप्रतिम हस्ताक्षराने सोशल मीडियावर व्हायरल झाली. तिच्या उत्कृष्ट हस्ताक्षराने जगाचं लक्ष वेधून घेतलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement










