Kay Sangte Dnyanada : तब्बल 10 वर्षानंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका; कोण मारणार बाजी?
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Kay Sangte Dnyanada : तब्बल 10 वर्षानंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. कशी आहे तिथली परिस्थिती.
जम्मू आणि काश्मिर : जम्मु आणि काश्मिरात तब्बल 10 वर्षांनतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. 18 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात इथे निवडणुका पार पडतील. तर चार ऑक्टोबरला निकाल समोर येणार आहेत. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरात होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीचं महत्व अनेक अर्थांनी मोठं आहे. या निमित्ताने आज आपण काश्मिरमधली राजकीय परिस्थिती, कोणत्या राजकीय पक्षाची कुठे ताकद, आणि लोकसभा निवडणूकीत काश्मीरमध्ये दिसलेलं चित्र याचा आढावा घेणार आहोत.
- जम्मु आणि काश्मीरसाठी शेवटची निवडणूक २०१४ सालच्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पार पडली होती. २०१४ च्या निवडणूकीपूर्वी काँग्रेसने पीडिपीसोबतची आपली आघाडी तोडून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला.. या निवडणूकीच्या निकालानंतर कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही.
- २८ जागा जिंकत पीडीपी सर्वात मोठा पक्ष ठरला, भाजप ने २५ जागा जिंकल्या, नॅशनल कॉन्फरन्सने १५ तर काँग्रेसने १२ जागांवर विजय मिळवला.
- २०१४ साली निकालांनंतर जम्मु काश्मीरात सत्ता स्थापनेसाठी प्रचंड मोठं राजकीय नाट्य रंगलं होतं.
- या निकालानंतर सत्ता स्थापण्याचा पहिला प्रयत्न झाला तो नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजपाकडून.
- सत्तास्थापनेचा फॉर्म्युलाही ठरला पण तीव्र पक्षांतर्गत विरोधामुळे या नव्या युतीचा प्रस्ताव दोन्ही बाजूनी बारगळला.
- यानंतर नॅशनल कॉन्फरन्सने पीडीपीला आपला पाठिंबा देण्य़ाची तयारी दर्शवली पण पीडीपीने हा प्रस्ताव फेटाळला.
- अखेर मैत्री जुळली ती भाजपा आणि पीडीपीची आणि जन्म झाला एका ऐतिहासिक युतीचा.
advertisement
१ मार्च २०१५ ला पीडीपीचे मुफ्ती मोहम्मद सईद यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर भाजपाचे निर्मल सिंग उपमुख्यमंत्री झाले..
पण पीडीपी आणि भाजपाचे हे सरकार आपली टर्म पूर्म करु शकलं नाही. २०१८ साली भाजपाने पाठिंबा काढून घेतल्याने सरकार कोसळलं आणि राष्ट्रपती राजवट लागू झाली.
तर ५ ऑगस्ट २०१९ च्या ऐतिहासिक दिवशी केंद्र जम्मु काश्मीर साठीचं कलम ३७० रद्द केलं. तर लडाख केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर झाला.
advertisement
२०१९ सालापासून आजपर्यंत काश्मिरात निवडणूका झालेल्या नाहीत.
जम्मु काश्मीर विधानसभेत यंदा एकूण 90 जागांसाठी मतदान पार पडेल..
यातल्या ४३ जागा जम्मुतल्या आहेत तर ४७ काश्मीर खोऱ्यातल्या... पाकव्याप्त काश्मीर खोऱ्यातल्या २४ जागा राखीव ठेवल्या गेल्यात. जम्मु काश्मीरातल्या प्रत्येक निवडणूकीतली एक विशेष बाब म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधल्या २४ जागांवर निवडणूक जाहीर केली जाते पण त्याची प्रक्रीया पार पडत नाही. त्यामुळे आत्ताही जम्मु काश्मीरातल्या ९० तर पाकव्याप्त काश्मीरमधल्या २४ अशी तांत्रिकदृष्ट्या ११४ जागांवर ही निवडणूक पार पडणार आहे.
advertisement
पाकव्याप्त काश्मिरवरचा दावा भारताने सोडलेला नसल्याने दर निवडणूकीत ही तांत्रिक प्रक्रिया पार पाडली जाते. म्हणजे पाकव्याप्त काश्मीरातल्या २४ जागांवर निवडणूक तर जाहीर होते पण त्या जागा राखीव ठेवल्या जातात..
मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर जम्मुचं महत्त्व वाढलंय. इथे विधानसभेच्या नव्या सहा जागा अस्तित्वात आल्यात. हा भाग हिंदुबहुल असल्याने इथे भाजपाला मिळणारा पाठिंबा सकारात्मक आहे. २०१४ च्या विधानसभेत भाजपाने जिंकलेल्या २५ जागा या जम्मुतल्याच होत्या. २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत जम्मु आणि उधमपूर अशा दोन्ही जागांवर भाजपानेच विजय मिळवलेला. तर गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडल्याने जम्मुतली काँग्रेसची ताकद कमी झाल्याचं मानलं जातं..पण काही जांगावर काँग्रेसचाही प्रभाव दिसून येतो...पीपल्स डेमेक्रॅटिक पक्ष आणि नॅशनल कॉन्फरन्सचं या भागात फारसं प्राबल्य नसल्याने जम्मुचा भाग भाजपासाठी फेव्हरेबल मानला जातो.
advertisement
तर काश्मीर खोऱ्यात भाजपाची फारशी ताकद दिसत नाही. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीची काश्मीर खोऱ्यावर मोठी पकड आहे. काश्मीर खोऱ्यात काँग्रेसही आपली ताकद राखून आहे.
२०२४ लोकसभा निवडणूकीत काश्मीर खोऱ्यातल्या बारमुल्ला मतदारसंघातून नॅशनल कॉन्फरन्सच्या ओमर अब्दुल्लांचा पराभव करत युएपीए कायद्याअंतर्गत शिक्षा भोगणारा राशीद इंजिनिअर निवडून आलाय.तर अनंतनाग-राजौरी या आपल्य़ा पारंपरिक मतदारसंधातून पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती यांनाही पराभव पत्करावा लागलाय..
advertisement
कलम ३७० काढल्यानंतर जम्मु काश्मीरात २०२० साली स्थानिक पातळीवरच्या निवडणूका पार पडल्या होत्या. राज्यातल्या २८० विकास परिषदांसाठी ही निवडणूक झाली. यात भाजपाने सर्वाधिक ७५ जागांवर विजय मिळवला तर नॅशनल कॉन्फरन्सला ६७ जागा मिळाल्या. पिडीपी २७ जागांवर विजयी झाली आणि काँग्रेस २६, इतर ५० जागांवर अपक्षांना विजय मिळाला. २०२० नंतर थेट २०२४ साली जम्मु काश्मिरच्या नागरिकांनी मतदान केलं.
advertisement
लोकसभा निवडणुकांचा आढावा घेतला तर वर्षांनुवर्ष काश्मीरच्या राजकारणावर पकड ठेवणाऱ्या परिवारवादी पक्षांना आणि नेत्यांना जनतेनं नाकारलेलं दिसतं. ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांचा पराभवातून त्याचेच संकेत मिळाल्याचा अंदाज व्यक्त होतो. यंदाची निवडणूकही स्थानिक विरुद्ध स्थानिक पक्ष अशी होण्याचं सध्याचं चित्र आहे. त्यामुळे प्रखर राष्ट्रवाद आणि स्थानिक अस्मिता हे प्रचारातले प्रमुख मुद्दे असु शकतात. जम्मु काश्मीरातली निवडणूक बुलेट विरुद्ध बॅलेट अशी मानली जाते. बंदुकीच्या गोळीला, दहशतीला न जुमानता लोकसभेच्या निवडणूकीत काश्मिरच्या जनतेनं आपली हिंमत दाखवून दिलीये. आत्ताही विधानसभा निवडणूकीत काश्मीरी जनतेकडून अशाच खंबीर बाण्याची अपेक्षा व्यक्त होतेय.
कलम ३७० काढल्यानंतर जम्मु काश्मीरात २०२० साली स्थानिक पातळीवरच्या निवडणूका पार पडल्या होत्या. राज्यातल्या २८० विकास परिषदांसाठी ही निवडणूक झाली. यात भाजपाने सर्वाधिक ७५ जागांवर विजय मिळवला तर नॅशनल कॉन्फरन्सला ६७ जागा मिळाल्या. पिडीपी २७ जागांवर विजयी झाली आणि काँग्रेस २६, इतर ५० जागांवर अपक्षांना विजय मिळाला.
२०२० नंतर थेट २०२४ साली जम्मु काश्मिरच्या नागरिकांनी मतदान केलं.. या लोकसभा निवडणूकीत जम्मु काश्मीरात विक्रमी ५८.५८ टक्के मतदान झालं त्यात महिलांचा वाटा होता ५६.३८ टक्के.
२०२० नंतर थेट २०२४ साली जम्मु काश्मिरच्या नागरिकांनी मतदान केलं.. या लोकसभा निवडणूकीत जम्मु काश्मीरात विक्रमी ५८.५८ टक्के मतदान झालं त्यात महिलांचा वाटा होता ५६.३८ टक्के.
आगामी विधानसभा निवडणूकीत जम्मु काश्मिरातल्या एकूण मतदारांची संख्या आहे ८७ लाख इतकी. यातले २० लाख ७० हजार युवा मतदार आहेत..त्यातले ३ लाख ७१ हजार फर्स्ट टाईम वोटर. त्यांमुळे युवा मतदार आणि महिला हे दोन्ही फॅक्टर आगामी निवडणूकीत अत्यंत महत्त्वाचे असतील.
वाचा - ठाकरेंना हवा CM पदाचा चेहरा, काँग्रेसकडे 3 तर पवारांकडे 2 नावं, पसंती कुणाला?
लोकसभा निवडणूकांचा आढावा घेतला तर वर्षांनुवर्ष काश्मीरच्या राजकारणावर पकड ठेवणाऱ्या परिवारवादी पक्षांना आणि नेत्यांना जनतेनं नाकारलेलं दिसतं. ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांचा पराभवातून त्याचेच संकेत मिळाल्याचा अंदाज व्यक्त होतो... यंदाची निवडणूकही स्थानिक विरुद्ध स्थानिक पक्ष अशी होण्याचं सध्याचं चित्र आहे. त्यामुळे प्रखर राष्ट्रवाद आणि स्थानिक अस्मिता हे प्रचारातले प्रमुख मुद्दे असु शकतात... जम्मु काश्मीरातली निवडणूक बुलेट विरुद्ध बॅलेट अशी मानली जाते...बंदुकीच्या गोळीला, दहशतीला न जुमानता लोकसभेच्या निवडणूकीत काश्मिरच्या जनतेनं आपली हिंमत दाखवून दिलीये. आत्ताही विधानसभा निवडणूकीत काश्मीरी जनतेकडून अशाच खंबीर बाण्याची अपेक्षा व्यक्त होतेय
Location :
Jammu and Kashmir
First Published :
August 17, 2024 11:54 PM IST
मराठी बातम्या/Politics/
Kay Sangte Dnyanada : तब्बल 10 वर्षानंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका; कोण मारणार बाजी?