Vidhansabha Election : विधानसभेपूर्वी मुंबईत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री बॅनर्जी यांची भेट; ममतांनी जाहीर केली भूमिका
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Vidhansabha Election : मुंबईत उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट झाली. यानंतर दोघांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली.
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हालचालींना वेग आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सीएम ममता दीदी शरद पवार यांची सुद्धा भेट घेणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बॅनर्जी यांची ठाकरेंसोबतची ही पहिलीच भेट आहे. या भेटीनंतर ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
ममता-ठाकरेंची भेट
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, ही घरगुती भेट आहे. भावाबहिणीचं नातं आहे. आम्ही भेट घेत असतो. सर्वात जास्त आणीबाणी मोदी यांच्या काळात आहे. अनेक आमदारांना निलंबित करून नवीन बिल आणले. आणीबाणीला आम्ही सपोर्ट करत नाही. मुंबईमध्ये तुम्हाला जास्त माहित आहे. उद्धवजी आणि शरद पवार यांची मी कायम भेट घेत असते. हे सरकार स्थिर नाही. खेळ तर आत्ता सुरू झालाय. मुरली देवरांसोबत ओळख होती. मात्र, आता कोणी ओळखीचं नाही. उद्धव ठाकरे वाघासारखे लढले. त्यांचं चिन्ह काढून घेतलं, नाव काढून घेतलं, मात्र ते लढले, असं कौतुक ममता बॅनर्जी यांनी केलं. यावेळी आगामी विधानसभेला ठाकरेंचा प्रचार करणार असल्याची भूमिका ममता बॅनर्जी यांनी जाहीर केली. बंगालमध्ये आम्ही सीपीएमविरोधात लढलो आहोत. मात्र तिथे काँग्रेस त्यांच्यासोबत होती. त्यामुळे आम्ही सोबत नव्हतो. मात्र, आम्ही देशात एकत्र आहोत. इंडिया आघाडी आमच्यासाठी महत्वाची आहे, अशी प्रतिक्रिया बॅनर्जी यांनी दिली.
advertisement
तर उद्धव ठाकरे म्हणाले, की ममता दीदी मुंबईत येतात, तेव्हा आमची भेट घेतात. कुटुंबिक भेट आहे. राजकीय विषय जास्त आणू नका. मी राजकीय विषयांवर स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन बोलेल.
अभिषेक बॅनर्जी यांनीही घेतली ठाकरेंची भेट
4 जून रोजी, जेव्हा लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, तेव्हा ठाकरे यांनी ममता यांच्याशी संवाद साधला होता आणि सांगितले होते की इंडिया आघाडीने केंद्रात सरकार स्थापन करण्याचा दावा केला पाहिजे. ठाकरे यांनी मीडियाला सांगितले की मी बॅनर्जींशी बोललो होतो आणि त्या बोर्डात होत्या. गेल्या वर्षी, बॅनर्जी यांनी मातोश्रीला भेट दिली आणि ठाकरे यांना राखी बांधली जेव्हा त्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत होत्या. जूनमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी ठाकरे यांची भेट घेतली. विरोधी गटाच्या वाटचालीबाबत अभिषेक ठाकरेंशी बोलले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 12, 2024 5:19 PM IST
मराठी बातम्या/Politics/
Vidhansabha Election : विधानसभेपूर्वी मुंबईत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री बॅनर्जी यांची भेट; ममतांनी जाहीर केली भूमिका