Pune: पुण्यात होळीच्या इव्हेंटमध्ये दुर्घटना, स्टेजचा काही भाग कोसळला, घटनास्थळाचा पहिला VIDEO
- Published by:Sachin S
Last Updated:
पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मुंढवा परिसरात रॉयल पाम्सवर होळीचा इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे: राज्यभरात धुळीवंदनाच्या उत्साहात सगळेच रंगून गेले आहे. अशातच पुण्यामध्ये होळीच्या इव्हेंटमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. होळीच्या इव्हेंटमध्ये स्टेज कोसळला आहे. स्टेजचा काही भाग कोसळून काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली नाही.
पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मुंढवा परिसरात रॉयल पाम्सवर होळीचा इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. या इव्हेंटमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांनी गर्दी केली होती. दुपारच्या सुमारास अचाानक होळी इव्हेंटमध्ये स्टेजचा काही भाग कोसळला. होळी इव्हेंट सुरू होण्यापूर्वीच स्टेजचा लोखंडी बिम कोसळून गोंधळ उडाला.
advertisement
[video width="478" height="850" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/WhatsApp-Video-2026-03-03-at-16.58.45-2026-03-0bdf804a75f55451b0836c6d46cfe05a.mp4"][/video]
स्टेज बांधणीसाठी असणारा आडवा लोखंडी बिम कोसळल्याची पोलिसांची माहिती दिली आहे. या घटनेत काही जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सुदैवानं या दुर्घटनेत मोठी हानी टळली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. काही तरुणांच्या अंगावर लोखंडी स्टेज कोसळला आहे, त्यामुळे जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जो स्टेज कोसळला आहे तो फक्त उभा करण्यात आला होता, त्याला कुठेही आधार दिलेला नव्हता. तात्पुरत्या स्वरुपातला हा स्टेज होताा. पण, उभारणीचं नियोजन चुकल्याामुळे स्टेजचा काही भाग कोसळला असल्याचं सांगितलं जात आहे.
पुण्यात ठिकठिकाणी अशा होळी इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे अशा इव्हेंटमध्ये परवानगी नियोजनाचा प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाला आहे.
advertisement
(सविस्तर बातमी लवकरच)
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 03, 2026 4:54 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune: पुण्यात होळीच्या इव्हेंटमध्ये दुर्घटना, स्टेजचा काही भाग कोसळला, घटनास्थळाचा पहिला VIDEO








