Pune : आषाढी वारीआधी शेतकऱ्यांचा हिरमोड, शेकडो वर्षाची परंपरा खंडित, देहू संस्थानाचा मोठा निर्णय!

Last Updated:

Ashadhi wari bail jadi culture : देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानने आता पालखीचा चांदीचा रथ आणि चौघड्याची गाडी ओढण्यासाठी स्वतःच्या मालकीची बैलजोडी खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Ashadhi wari bail jadi culture
Ashadhi wari bail jadi culture
Tukaram maharaj dehu sansathan : दरवर्षी तन मन धन हरपून आषाढी वारीनिमित्त राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरला जात असतात. त्याच बरोबर त्यांच्यासोबत संतांचे पालखी रथ देखील जात असतात. बैलांच्या सहाय्याने या पालखी रथ ओढले जातात. त्यामुळे बैलजोडी असणाऱ्या शेतकऱ्याला आपल्या बैलजोडीला पालखीचा रथ ओढण्याचा मान मिळावा अशी आशा असते. मात्र, आता आषाढी वारीआधी शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानने असा काही निर्णय घेतलाय की, ज्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे.

स्वतःच्या मालकीची बैलजोडी खरेदी करणार

देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानने आता पालखीचा चांदीचा रथ आणि चौघड्याची गाडी ओढण्यासाठी स्वतःच्या मालकीची बैलजोडी खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे, अनेक वर्षांपासून रथ ओढण्यासाठी शेतकऱ्यांच्या बैलांना मिळणारा मान आता खंडित होणार आहे.

18 जून रोजी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान

advertisement
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी 18 जून रोजी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे आणि या सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे. नुकत्याच झालेल्या श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या बैठकीत, संस्थेच्या आवश्यकतेनुसार दोन सशक्त बैलजोड्या पालखी रथासाठी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. याव्यतिरिक्त, चौघड्याच्या गाडीसाठी देखील एक सर्वसाधारण बैलजोडी खरेदी केली जाईल.
advertisement

प्रथा यावर्षीपासून थांबणार

यापूर्वी, पालखी पंढरपूरकडे मार्गक्रमण करत असताना, रथाला जुंपण्यासाठी पुणे जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांचा उपयोग केला जात असे, जो एक प्रकारचा सन्मान मानला जाई. यासाठी देहू देवस्थान संस्थान शेतकऱ्यांकडून अर्जही मागवत असे. मात्र, आता स्वतःच्या बैलजोड्या खरेदी केल्यामुळे ही प्रथा यावर्षीपासून थांबणार आहे.

यंदा अर्जही नाही?

advertisement
पंढरपूरला जाण्यासाठी पालखी रथात विराजमान होतात. हा रथ ओढण्यासाठी पुणे जिल्ह्यातून विविध बैलजोड्यांना मान दिला जात होता. मात्र, यंदा बैलजोडी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालखी रथाच्या बैलजोड्यांसाठी अर्ज करण्याचे आवाहन देहू देवस्थान संस्थानच्या वतीने करण्यात येत असे.

संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष म्हणतात...

दरम्यान, पालखी रथासाठी दोन आणि चौघडा गाडीसाठी एक अशा तीन बैलजोड्या देवस्थान खरेदी करणार आहे. बदल म्हणून हा निर्णय घेतला आहे. पालखी रथास जोडण्यासाठी कोल्हापूर, सातारा आणि कर्नाटकच्या बाजारपेठेत जाऊन बैलांची पाहणी करून तीन जोड्या विकत घेतल्या जाणार आहेत. या बैलजोड्या शेतकऱ्यांकडूनच खरेदी करण्यात येणार आहेत. बैलांचा सांभाळ देवस्थान करणार आहे, असं जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune : आषाढी वारीआधी शेतकऱ्यांचा हिरमोड, शेकडो वर्षाची परंपरा खंडित, देहू संस्थानाचा मोठा निर्णय!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement