Baramati Crime : कडाक्याची थंडी, मैफिल जमली! दारू पित बसलेल्या दोघा मित्रांनी अचानक काढला तिसऱ्याचा काटा

Last Updated:

Baramati Crime News : शिवी दिल्याच्या कारणावरून बारामती शहरात एकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. शिवी दिली म्हणून मित्रानेच मित्राची हत्या केलीय.

Baramati Crime brutal act committed by friends
Baramati Crime brutal act committed by friends
Baramati Crime (जितेंद्र जाधव, प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात एक धक्कादायक घटना घडली. हाडं गोठवणाऱ्या थंडीत रात्रीच्या वेळी एक अत्यंत धक्कादायक आणि क्रूर घटना घडली समोर आलीये. दारूच्या नशेत झालेल्या क्षुल्लक भांडणातून दोन मित्रांनी तिसऱ्या मित्राचा निर्घृण खून केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आरोपींनी गुन्ह्याची कबुली देण्यासाठी थेट पोलीस ठाणे गाठलं.

दारू पित बसले अन् पेटला वाद

बारामतीतील जुन्या मोरगाव रस्त्यावर एका अंधाऱ्या ठिकाणी तिघं मित्र एकत्र बसून दारू पीत होते. जशी नशा चढू लागली, तशी त्यांच्यात शिवीगाळ सुरू झाली आणि त्याचे रूपांतर जोरदार वादात झालं. माऊली धनंजय लोंढे याने शिवागाळ केल्याने दोन्ही मित्रांनी त्याला जीवानिशी मारलं. वाद इतका वाढला की, संतप्त झालेल्या दोघांनी बाजूला असलेला एक दगड उचलला आणि त्यांनी तिसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याला ठेचलं. त्यांचा मित्र मरेपर्यंत दोघांनी त्याला दगडाने मारहाण केली आणि त्याचा डोक्याचा चेंदामेंदा केला.
advertisement

माऊली लोंढेचा जागीच मृत्यू

या घटनेनंतर भानावर आलेले दोन्ही आरोपी थेट पोलीस ठाण्यात हजर झाले आणि त्यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशीरा घडलेल्या या घटनेत अविनाश उर्फ माऊली धनंजय लोंढे (वय 20, राहणार बारामती) याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी समीर इक्बाल शेख आणि प्रथमेश राजेंद्र दळवी या दोघांना ताब्यात घेतले आहे.
advertisement

आरोपींचं आत्मसमर्पण

दरम्यान, अविनाशचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच दोन्ही आरोपींनी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होऊन आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. दोन मित्रांनी दारुच्या नशेत केलेली हे क्रूर कृत्य शहरात चर्चेचा विषय ठरलं आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Baramati Crime : कडाक्याची थंडी, मैफिल जमली! दारू पित बसलेल्या दोघा मित्रांनी अचानक काढला तिसऱ्याचा काटा
Next Article
advertisement
Tejasvee Ghosalkar: 'नाती बदलू शकतात पण...', अखेर तेजस्वी घोसाळकरांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र, मनातलं सगळं सांगितलं
'नाती बदलू शकतात पण...', अखेर तेजस्वी घोसालकरांनी मनातलं सगळं सांगितलं,
  • 'नाती बदलू शकतात पण...', अखेर तेजस्वी घोसालकरांनी मनातलं सगळं सांगितलं,

  • 'नाती बदलू शकतात पण...', अखेर तेजस्वी घोसालकरांनी मनातलं सगळं सांगितलं,

  • 'नाती बदलू शकतात पण...', अखेर तेजस्वी घोसालकरांनी मनातलं सगळं सांगितलं,

View All
advertisement