Pune : बीडचं देशमुख कुटुंबीय भर पावसात कस्पटे कुटुंबियांच्या भेटीला, म्हणाले 'न्यायासाठी रस्त्यावर उतरा...'

Last Updated:

Dhanajay Deshmukh Meet vaishnavi kaspate family : वैष्णवी हगवणे प्रकरणात आता आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून आता बीडच्या संतोष देशमुखांच्या कुटूंबियांनी पुण्यात कस्पटे कुटूंबियांची भेट घेतली आहे.

Dhanajay Deshmukh Meet vaishnavi kaspate family
Dhanajay Deshmukh Meet vaishnavi kaspate family
Dhanajay Deshmukh In Pune : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder case) एका मागून एका गोष्टीचे खुलासे होत आहेत. दुसरीकडे पुण्यातील वैष्णवी हगवणे (vaishnavi kaspate) प्रकरणामुळे महाराष्ट्राला धक्का बसला होता. अशातच बीड जिल्ह्यातील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबिय वैष्णवी कस्पटे यांच्या कुटुंबीयांची भेटीसाठी त्यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं.

धनंजय देशमुख काय म्हणाले?

आमचं दुःख आणि कस्पटे कुटुंबीयांचं दुःख सारखं आहे, आमचा पण माणूस गेला आहे. छोट बाळ आहे त्यांच्याकडे या दुःखातून सावरण्याचा बळ दिलं पाहिजे, असं धनंजय देशमुख म्हणाले. आरोपींना नक्कीच हे सगळे भोग आहेत भोगावे लागणार. पण माझी इच्छा आहे की, कस्पटे कुटुंबांना यातून पुढं यावं. खरी परीक्षा तर आता पुढं आहे. आपल्याला सिद्ध करावं लागणार आहे, त्यासाठी योग्य दिशा शोधली पाहिजे, असंही धनंजय देशमुख म्हणाले.
advertisement

आमच्या भावान काय पाप केलं?

आमच्यासारखं कस्पटे कुटुंबीयांना न्याय घरी बसून नाही मिळत, त्यासाठी रस्त्यावर यावं लागतं. उपोषण करावं लागतं, असंही धनंजय देशमुख म्हणाले. आमच्या भावान काय पाप केलं होतं? परंतु आम्हाला आता न्याय मागावा लागत आहे, असंही धनंजय देशमुख म्हणाले आहेत.
दरम्यान, हुंडा बळी प्रकरणात 23 वर्षाच्या वैष्णवी शशांक हगवणे हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. तर संतोष देशमुख प्रकरणात आरोपींना अटक केली गेली असून कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. त्यामुळे आता दोन्ही प्रकरणामुळे अजित पवार यांची कोंडी होत असल्याचं पहायला मिळतंय.
मराठी बातम्या/पुणे/
Pune : बीडचं देशमुख कुटुंबीय भर पावसात कस्पटे कुटुंबियांच्या भेटीला, म्हणाले 'न्यायासाठी रस्त्यावर उतरा...'
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement