advertisement

काळजाचा थरकाप! संसाराचा गाडा ओढताना नियतीने घात केला; मळणी यंत्रात स्कार्फ अडकला अन् कुटुंबाला पोरकं करून गेली!

Last Updated:

मशीनचा वेग जास्त असल्याने काही कळण्याच्या आत शुभांगी या मशीनकडे ओढल्या गेल्या. यात त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली.

News18
News18
शेतात धान्य मळणीचे काम करत असताना एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली आहे. मळणी यंत्रात डोक्याचा स्कार्फ अडकल्यामुळे एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना भोर तालुक्यातील कुरंगवडी येथे घडली असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. शुभांगी निलेश राऊत असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुरंगवडी परिसरात सध्या पिकांची काढणी आणि मळणीची कामे वेगाने सुरू आहेत. शुभांगी राऊत या ट्रॅक्टरला जोडलेल्या धान्य मळणी यंत्राजवळ काम करत होत्या. कडक उन्हामुळे त्यांनी डोक्याला स्कार्फ बांधलेला होता. काम करत असताना अचानक या स्कार्फचे टोक फिरत्या मशीनमध्ये अडकले. मशीनचा वेग जास्त असल्याने काही कळण्याच्या आत शुभांगी या मशीनकडे ओढल्या गेल्या. यात त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली.
advertisement
हा प्रकार लक्षात येताच तिथे उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी आणि इतर मजुरांनी तातडीने मशीन बंद केली आणि त्यांना बाहेर काढले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शुभांगी यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या घटनेची नोंद स्थानिक पोलिसांनी केली असून, अचानक घडलेल्या या मृत्यूमुळे राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतीकाम करताना अशा प्रकारे स्कार्फ किंवा साडीचा पदर सांभाळून कामं केली पाहिजेत नाहीतर शुभांगीसारखं संकट ओढवण्याचा धोका असतो.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
काळजाचा थरकाप! संसाराचा गाडा ओढताना नियतीने घात केला; मळणी यंत्रात स्कार्फ अडकला अन् कुटुंबाला पोरकं करून गेली!
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement