Pune Special Train : पुणे-नागपूर प्रवाशांना मध्य रेल्वेचं गिफ्ट; नवीन वर्षानिमित्त धावणार या विशेष रेल्वेगाड्या, पाहा वेळापत्रक
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
नागपूर, पुणे, हडपसर आणि राणी कमलापती (भोपाळ) दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या गाड्या विशेष शुल्कासह धावणार असून, पर्यटकांना आणि प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे : हिवाळी सुट्ट्या, नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागपूर, पुणे, हडपसर आणि राणी कमलापती (भोपाळ) दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या गाड्या विशेष शुल्कासह धावणार असून, पर्यटकांना आणि प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
नागपूर - हडपसर - नागपूर विशेष गाडी: गाडी क्रमांक ०१२२१ नागपूरहून २६, २९, ३१ डिसेंबर आणि २ जानेवारी रोजी संध्याकाळी ७:४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:२५ वाजता हडपसरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१२२२ हडपसरहून २८, ३० डिसेंबर तसेच १ आणि ४ जानेवारीला दुपारी ३:५० वाजता नागपूरसाठी रवाना होईल.
advertisement
पुणे - नागपूर - पुणे विशेष गाडी: गाडी क्रमांक ०१४१९ पुणे रेल्वे स्थानकावरून २७, २९, ३१ डिसेंबर आणि ३ जानेवारी रोजी रात्री ८:३० वाजता सुटेल, जी दुसऱ्या दिवशी दुपारी २:०५ वाजता नागपूरला पोहोचेल. याउलट, गाडी क्रमांक ०१४२० नागपूरहून २८, ३० डिसेंबर तसेच १ आणि ४ जानेवारी रोजी दुपारी ४:१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११:४५ वाजता पुण्याला पोहोचेल.
advertisement
राणी कमलापती - हडपसर - राणी कमलापती विशेष गाडी: मध्य प्रदेशातील राणी कमलापती स्थानकावरून गाडी क्रमांक ०२१५६ ही २७ डिसेंबर, ३ आणि १० जानेवारी रोजी सकाळी ८:४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२:१० वाजता हडपसरला येईल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०२१५५ हडपसरहून २८ डिसेंबर, ४ आणि ११ जानेवारीला सकाळी ७:५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११:४० वाजता राणी कमलापती स्थानकावर पोहोचेल. प्रवाशांनी या विशेष गाड्यांच्या वेळापत्रकाची नोंद घेऊन आपले आरक्षण निश्चित करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 8:18 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Special Train : पुणे-नागपूर प्रवाशांना मध्य रेल्वेचं गिफ्ट; नवीन वर्षानिमित्त धावणार या विशेष रेल्वेगाड्या, पाहा वेळापत्रक









