Sassoon Hospital : 'त्या' प्रकरणात ससून, पोलीस अन् तुरुंग प्रशासनाची CID चौकशी व्हावी, काँग्रेसची मागणी

Last Updated:

Sassoon Hospital : गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या ससून रुग्णालंय, पोलीस आणि तुरुंग प्रशासनाची सीआयडी अथवा विशेष पथकद्वारे चौकशी करण्याची मागणी काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी केली आहे.

ससून रुग्णालय
ससून रुग्णालय
पुणे, 4 ऑक्टोबर (वैभव सोनवणे, प्रतिनिधी) : पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. रुग्णालयात उपचार घेणारा आरोपी येथून ड्रग रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता काँग्रसेही आक्रमक झाली आहे. ससून रुग्णालायात उपचार घेत असलेला कैदी ललित पाटील हा तेथून अमली पदार्थाचे रॅकेट चालवत होता. पोलिसांनी पकडल्यावर तो तेथून पळून गेला. हा सारा घटनाक्रम संशयस्पद असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी पत्राद्वारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
अमली पदार्थचे रॅकेट मधील आरोपी असलेला पाटील जर गंभीर आजारी होता, तर पोलिसांना हिसका देऊन त्यांच्या पेक्षा वेगाने कसा पळाला? तो आजारी होता यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. तसेच हा वेगवेगळ्या आजारावर उपचार घेत होता हेही संशयास्पद आहे. त्यामुळे हा सारा घटनाक्रम संशस्पाद शासकीय यंत्रणेला चक्रवणारा आहे. पोलीस, ससून आणि तुरुंग प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहभागशिवाय हे घडणे शक्य नाही, असे धंगेकर यांनी गृहमंत्र्याना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
advertisement
विविध गुन्ह्याखालील अटकेत असणारे अनेक कुख्यात गुन्हेगार उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयात दाखल होतात. ऐशोआराम करतात, असे माध्यमात आलेल्या वृत्तांवरून स्पष्ट होते. कुख्यात मटका किंग विरल सावलाही अशीच सेवा या तीनही शासकीय यंत्रणाकडून घेत आहे. सामाजिक जीवनात वावरताना अशा अनेक घटना कानावर येत असतात. त्यामुळे सांस्कृतिक राजधानी पुण्यातील समाजमन भयभीत झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई होणे आणि त्यांना न्यायाच्या प्रक्रियेखाली आणणे आवश्यक आहे.
advertisement
या साऱ्या प्रकारात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता असल्याने याची विशेष तपास पथक (sit) नेमून चौकशी आवश्यक आहे. त्यामुळे याप्रकारणात विशेष पथक नियुक्त करावे अथवा सीआयडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणीही धंगेकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Sassoon Hospital : 'त्या' प्रकरणात ससून, पोलीस अन् तुरुंग प्रशासनाची CID चौकशी व्हावी, काँग्रेसची मागणी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement