Daund Crime : दौंडमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना! 4 वर्षाच्या मुलाला रोड रोलरने चिरडलं, CCTV व्हिडीओ समोर
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Daund 4 year boy crushed by road roller : रोलर फिरवण्याचा वेग जास्त असल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि खेळत असलेला आर्यन रोलरच्या चाकाखाली आला.
Daund Crime News : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. शहरातील जनता कॉलनी भागातील सेंट सेबिस्टियन हायस्कूलच्या मागील रस्त्याचे डांबरीकरण सुरू असताना एका 4 वर्षांच्या चिमुरड्याचा रडारोळ झाला. आर्यन जाधव असं या मृत बालकाचे नाव असून, रोड रोलरखाली चिरडल्या गेल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मजुरी करणाऱ्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
वाहनावरील नियंत्रण सुटलं अन्...
आर्यनची आई याच डांबरीकरणाच्या कामावर मजूर म्हणून काम करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, रोड रोलर चालक आपले काम लवकर उरकण्याच्या घाईत होता. रोलर फिरवण्याचा वेग जास्त असल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि खेळत असलेला आर्यन रोलरच्या चाकाखाली आला. या भीषण अपघातानंतर घाबरलेला रोड रोलर चालक घटनास्थळावरून पळून गेला असून पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत.
advertisement
सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा
या अपघातासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू असताना वाहतूक बंद करणे किंवा सुरक्षेसाठी कठडे उभारणे आवश्यक होते. मात्र, विभागाने कोणतेही सूचनाफलक न लावता किंवा रस्ता बंद न करताच काम सुरू ठेवले होते. प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या या कामामुळे एका निष्पाप बालकाला आपला जीव गमवावा लागला.
advertisement
दौंडमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना! 4 वर्षाच्या मुलाला रोड रोलरने चिरडलं #Daund #Crime pic.twitter.com/qlQnZK504k
— News18 Marathi (@News18_marathi) January 23, 2026
कंत्राटदाराचे सुपरवायझर गायब
धक्कादायक बाब म्हणजे, ज्या वेळी हा अपघात घडला, तेव्हा बांधकाम विभागाचे कोणतेही अधिकारी किंवा कंत्राटदाराचे सुपरवायझर घटनास्थळी उपस्थित नव्हते. आर्यनच्या मृत्यूनंतरही संबंधित जबाबदार व्यक्तींनी तिथे फिरकण्याची तसदी घेतली नाही. कामाच्या ठिकाणी सुरक्षात्मक उपाययोजना शून्य असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. प्रशासकीय अनस्थेमुळे एका गरीब कुटुंबाचे बाळ हिरावले गेल्याने संताप व्यक्त होत आहे.
advertisement
अपघाताचा गुन्हा दाखल
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, मजुरी करून पोट भरणाऱ्या पालकांनी आपल्या डोळ्यादेखत मुलाचा असा अंत पाहिल्याने परिसरात मोठी शांतता पसरली आहे. संबंधित कंत्राटदार आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 1:05 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Daund Crime : दौंडमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना! 4 वर्षाच्या मुलाला रोड रोलरने चिरडलं, CCTV व्हिडीओ समोर









