सिलेंडरमधून गॅस गायब करणारी टोळी पुणे पोलिसांच्या हाती, चोरीची अनोखी शक्कल
- Published by:Prachi Amale
Last Updated:
घरगुती गॅसच्या प्रत्येक टाकीमधून प्रत्येकी 1 किलो गॅस हे कामगार काढून घेत आणि तो रिकाम्या टाकीत भरत होते.
पुणे : घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरून विक्री करणाऱ्या मोठ्या टोळीचा वानवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. वानवडी येथे घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक गॅसच्या सिलेंडरमध्ये पाईपच्या सहाय्याने बेकायदेशीर गॅस भरून बाजारामध्ये चढत्या दराने विक्री ही टोळी करत होती.
4 सप्टेंबरला वानवडी पोलीस पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलिसांना काही संशयस्पाद हालचाली दिसल्या. वानवडीच्या सुर्यलोक नगरी सोसायटीतील गार्डनसमोर येथे एका तीन चाकी पॅगोमध्ये दोन इसम हे घरगुती गॅसच्या टाक्यांमधून इतर रिकाम्या गॅसच्या टाक्यांमध्ये गॅस भरत होते. ज्वलनशिल आणि स्फोटक पदार्थ गैररित्याने हाताळून मानवी जिवीतास धोका उत्पन्न होईल असे कृत्य करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
advertisement
टेम्पोमध्ये करायचे गॅस ट्रान्सफर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पॅगो टेम्पोमध्ये एक इसम घरगुती सिलेंडर गॅसला दोन्ही बाजुने रेग्युलटर असलेला पॉईप जोडून दुसरे टोक दुसरा इसम हाताने दुसऱ्या गॅस सिलेंडरला जोडून त्याद्वारे गॅस ट्रान्सफर करताना आढळून आला. पंकज किसनसिंग ठाकुर, (20 वर्षे) आणि प्रविण बंगालीराम कुमार, (35 वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत.
advertisement
प्रत्येक सिलेंडरमधून काढायचे 1 किलो गॅस
त्यांच्याकडे चौकशी करताना त्यांनी सांगितले की, आम्ही समीधा भारत गॅस एजन्सी, माळवाडी रोड येथील कामगार असून आम्ही भारत गॅसच्या टाक्यांचे वितरण करत होते. घरगुती गॅसच्या प्रत्येक टाकीमधून प्रत्येकी 1 किलो गॅस हे कामकार काढून घेत आणि तो रिकाम्या टाकीत भरत होते. आरोपींनी सिलेंडरमधून गॅस काढण्यासाठी विशेष रेग्युलेटर तयार केले होते. या रेग्युलेटरच्या मदतीने ते गॅस काढून घेत होते. पॅगो टेम्पोमध्ये हा सगळा प्रकार सुरू होता.
advertisement
2 लाख 36 हजाराचा मुद्देमाल जप्त
एका टाकीतून दुसऱ्या टाकीत भरताना गॅस सारखा ज्वलनशिल आणि स्फोटक पदार्थ बेजबाबदारपणे हातळणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. भर वस्तीत असा प्रकार म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखा आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 2 लाख 36 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे
advertisement
पोलिसांचे आवाहन
पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपण घरगुती वापरचा सिलेंडर गॅस घेताना तो व्यवस्थित तपासून घ्यावा. सार्वजनिक ठिकाणी घरगुती वापरायचे गॅस सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस भरत आहे, असे समाज विघातक लोक हे लोकांच्या जिवाशी खेळण्यासारखे आहे.अशा संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 05, 2025 6:26 PM IST