पुण्यातल्या तरुणीची कमाल, मोपेड स्कूटरवर लेह लडाखपर्यंतचा प्रवास, 6 हजार किमी journey ची अनोखी कहाणी

Last Updated:

6 हजार किलोमीटरचा प्रवास करून घरी परतल्यावर तिचं जोरदार स्वागत करण्यात आलं. सुरुवातीपासून प्रवासाची आवड असल्याने पुजाने हा प्रवास देखील लवकर पूर्ण केला, असे ती म्हणाली. 

+
पुण्यातल्या

पुण्यातल्या तरुणीची अनोखी कहाणी

शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : सध्या अनेक मुली आज प्रत्येक क्षेत्रात तरुणांच्या बरोबरीने कार्य करताना दिसत आहे. प्रत्येकाला काही तरी नवीन करण्याची जिद्द असते. कुणाला बाईक रायडिंग, कुणाला मोठ्या ट्रिपला जायचे असते तर आणखी इतर. यासाठी सर्वच जण आपापल्या परीने मेहनतही घेतात. आज अशाच एका तरुणीच्या जिद्दीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.
पुण्यातील या तरुणीने चक्क मॉपेड स्कुटरवर तब्बल 6 हजार किलोमीटरचा लेह-लडाख असा प्रवास केला आहे. पूजा ढाकुळकर असे या तरुणीचे नाव आहे. पिंपरी चिंचवड येथील या तरुणीने पिंपरी चिंचवड ते स्पिथी व्हॅली असा होम टू होम प्रवास केला. एकूण 26 दिवसात तिने हा प्रवास पूर्ण केला. अतिशय थंड असलेल्या 14 डिग्री सेल्सिअस तापमानात बर्फाच्छादित रस्त्यांवरून या तरुणीने प्रवास केला.
advertisement
IIT च्या इंजीनिअरची कमाल, विना ड्रायव्हर चालते ही कार, टारझन दी वंडर कारसारख्या सुविधा, तुम्हीही व्हाल चकित...
मोपेड स्कूटर रून लेह लडाखच्या विंटर स्पिथी व्हॅलीचा प्रवास करणारी पूजा देशातील पहिलीच तरुणी ठरली आहे. आपल्या या प्रवासाचा अनुभव सांगताना पूजा म्हणाली की, मी घरातून निघाले. त्यानंतर वाराणसी, हिमाचलमधील काही ठिकाणे असा सगळा प्रवास केला आणि लडाख गाठले. त्या ठिकाणी रस्त्यावर प्रचंड बर्फ होता.
advertisement
अनेकजण त्या ठिकाणी बाईक घेऊन जातात. परंतु मी पहिल्यांदा त्याठिकाणी मॉपेड गाडी घेऊन गेले. तिथे पेट्रोलसाठी पेट्रोलपंप देखील नसतात. या कारणाने मी सोबत कॅनमध्ये पेट्रोल घेऊन गेली होती, असेही तिने सांगितले.
दरम्यान, आता 6 हजार किलोमीटरचा प्रवास करून घरी परतल्यावर तिचं जोरदार स्वागत करण्यात आलं. सुरुवातीपासून प्रवासाची आवड असल्याने पुजाने हा प्रवास देखील लवकर पूर्ण केला, असे ती म्हणाली.
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातल्या तरुणीची कमाल, मोपेड स्कूटरवर लेह लडाखपर्यंतचा प्रवास, 6 हजार किमी journey ची अनोखी कहाणी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement