तुमच्या मुलाला चांगला आणि वाईट स्पर्श कसा शिकवाल? पाहा Video

Last Updated:

पालक म्हणून तुम्ही मुलांच्या सुरक्षेसाठी काही खास पाऊले उचलायला हवीत.

+
News18

News18

पुुणे, 31 ऑक्टोबर : सध्या लहान मुलांवरील अत्याचाराची, लैंगिक शोषणाची प्रकरणे वाढतायत. अशावेळी पालक म्हणून तुम्ही मुलांच्या सुरक्षेसाठी काही खास पाऊले उचलायला हवीत. आपल्या मुलांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श समजला किंवा आपण त्याबद्दल त्यांना शिकवण दिली तर अशा घटना रोखता येऊ शकतात. यासंदर्भातच या विषयासंदर्भात काम करणाऱ्या पुण्यातील उमा पाटील यांनी माहिती दिली आहे.
चांगला स्पर्श म्हणजे काय?
जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला स्पर्श करतो आणि तेव्हा तुम्हाला त्यातून प्रेमाची भावना कळते किंवा खूप चांगले वाटते किंवा त्या स्पर्शाने सुरक्षित वाटते. तर अशा स्पर्शाला चांगला स्पर्श म्हणतात. ही गोष्ट तुम्ही मुलांना समजावून सांगितली पाहिजे आणि वेळ पडली तर ते स्पर्श त्यांना करून दाखवा. कसे की प्रेमाने मिठी मारणे, मायेने किस करणे, असं उमा पाटील सांगतात.
advertisement
वाईट स्पर्श म्हणजे काय?
वाईट स्पर्श हा आधीच मुलांना कळणं फार महत्वाचं असतं. आपल्या प्रायव्हेट बॉडी पार्टसना केल्या जाणाऱ्या स्पर्शाबद्दल त्यांना प्रामुख्याने सांगा. काही विशिष्ट अवयव असतात ज्यांना चांगला स्पर्श करणारा व्यक्ती कधीच टच करणार नाही. अशा अवयवांबाबत मुलांना विशेष माहिती द्या. अगदी सखोल माहिती देण्यासाठीही पालकांनी लाज बाळगू नका, असं उमा पाटील सांगतात.
advertisement
अनेकदा आपण लहान मुलांना थेट अशा गोष्टी सांगू शकत नाही, अशा वेळी हळूहळू एक एक गोष्ट त्यांना सांगावी. जमल्यास एखाद्या चित्रपटाचा वा शैक्षणिक व्हिडिओचा आधार घ्यावा. जेव्हा पालक आणि मुल यांच्यातील नाते घट्ट होईल तेव्हाच अशा लैंगिक शोषणाला आळा बसेल. कारण अनेकदा लहान मुलांचे आपल्या पालकांशीच नाते नीट असते अशावेळी ही गोष्ट कोणाला सांगावी हे त्यांना कळत नाही. त्यांनी प्रत्येक गोष्ट शेअर करावी असे वाटत असेल तर पहिले नाते अधिक घट्ट करा, अशी माहिती उमा पाटील यांनी दिलीये .
view comments
मराठी बातम्या/पुणे/
तुमच्या मुलाला चांगला आणि वाईट स्पर्श कसा शिकवाल? पाहा Video
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement