Ganeshotsav 2025: पुण्यातील इंद्रजीत यांची कमाल, AI च्या मदतीने साकारली गणपतीची 3D मूर्ती, Video

Last Updated:

यावर्षी या गणेशोत्सवासाठी त्यांनी ट्रायमोड लेसर स्कॅनरचा वापर करून 3D गणेश मूर्ती साकारली आहे.

+
News18

News18

पुणे: गणेशोत्सवाला अवघे पंधरा दिवस उरले आहेत. राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. शहरातील बाजारपेठेत गणरायाच्या आकर्षक आणि सुबक मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. यावर्षी पुणे शहरात प्रथमच AI च्या मदतीने गणपतीची 3D मूर्ती साकारण्यात येत आहे. याबाबतची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना इंद्रजीत जोशी यांनी दिली.
पारंपरिक कलांच्या पंढरीत असलेल्या पुणे शहराने तंत्रज्ञानाच्या नव्या वळणावर पाऊल टाकत, यंदाच्या गणेशोत्सवात एक अनोखी कामगिरी केली आहे. प्रथमच, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून गणपतीची 3D मूर्ती साकारण्यात आली आहे.
शहरातील इंद्रजीत जोशी यांनी, पारंपरिक शिल्पकलेचा आत्मा जपत, अत्याधुनिक AI सॉफ्टवेअरच्या मदतीने ही मूर्ती डिझाइन केली आहे. सर्वप्रथम गणपतीची मूळ रचना संगणकावर AI मॉडेलद्वारे तयार करण्यात आली. यानंतर 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून मूर्तीचे अचूक स्वरूप घडवण्यात आले.
advertisement
पुण्यातील तरुण इंद्रजीत जोशी यांचा रॅट 3D प्रिंटिंग आणि स्कॅनिंगचा डिजिटल व्यवसाय आहे. यावर्षी या गणेशोत्सवासाठी त्यांनी ट्रायमोड लेसर स्कॅनरचा वापर करून 3D गणेश मूर्ती साकारली आहे. मूर्ती स्कॅन करताना त्यांनी पर्यावरणाला कोणतीही इजा पोहोचणार नाही ह्याची काळजी घेतली आहे. 18 इंच, 8 इंच आणि 3 इंच या आकाराच्या मूर्ती ते स्कॅनिंगद्वारे साकारतात.
advertisement
मूर्तीला कोणतीही हानी नाही
IR मोड, texture मोड आणि लेसर मोडच्या मदतीने तयार करण्यात येणाऱ्या मूर्तीला कोणतीही हानी पोहोचत नाही. पूर्णपणे वायरलेस 3D स्कॅनिंग करून गणपती मूर्ती साकारण्यात येते.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Ganeshotsav 2025: पुण्यातील इंद्रजीत यांची कमाल, AI च्या मदतीने साकारली गणपतीची 3D मूर्ती, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement