पर्यटकांसाठी आनंदाची बातमी, पानशेत आणि वरसगाव धरण परिसरात विशेष पर्यटन बससेवा होणार सुरू, पीएमपीएमएलचा निर्णय
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
पुणे महानगरातील पर्यटक, निसर्गप्रेमी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ यांच्यावतीने पानशेत आणि वरसगाव धरण परिसरात विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे : पुणे महानगरातील पर्यटक, निसर्गप्रेमी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) यांच्यावतीने पानशेत आणि वरसगाव धरण परिसरात विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेवेमुळे शहरातील नागरिकांना निसर्गसौंदर्याचा अनुभव घेता येणार असून, ग्रामीण भागातील पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.
पुण्याच्या पश्चिम भागात वसलेल्या पानशेत धरण आणि वरसगाव धरण परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला, हिरवेगार डोंगर, जलाशय, धुके, धबधबे आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळा आणि हिवाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, सार्वजनिक वाहतुकीच्या मर्यादित सुविधांमुळे अनेकांना येथे जाणे जिकिरीचे ठरत होते. हीच अडचण लक्षात घेऊन पीएमपीएमएल प्रशासनाने विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
पीएमपीएमएलकडून सध्या लोणावळा, रांजणगाव गणपती, यमाई माता मंदिर, बनेश्वर मंदिर या ठिकाणी पर्यटन बस सेवा सुरू आहे. प्रवाशांचा आणि पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय पानशेत आणि वरसगाव या भागात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पीएमपीएमएलकडून या भागात बस सेवा सुरू आहे. परंतु, बस संख्या कमी असल्याने आता बस संख्या वाढविण्यात येणार आहे.
advertisement
पुणे शहरातून थेट निसर्गरम्य पर्यटनाची सोय
या नव्या पर्यटन बससेवेमुळे पुणे शहरातील विविध प्रमुख थांब्यांवरून थेट पानशेत–वरसगाव घाट परिसरात जाणे शक्य होणार आहे. यासाठी अत्याधुनिक, सुरक्षित आणि आरामदायी बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. या बससेवेमुळे खासगी वाहनांचा वापर कमी होऊन वाहतूककोंडी, अपघात आणि प्रदूषणावरही नियंत्रण मिळण्यास मदत होणार आहे.
रोजगारनिर्मितीला चालना
view commentsया निर्णयामुळे स्थानिक ग्रामस्थ, हॉटेल व्यावसायिक, छोटी दुकाने, गाईड, बोटिंग व्यवसाय, खाद्यपदार्थ विक्रेते यांना आर्थिक लाभ होणार आहे. स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याने या भागातील आर्थिक चक्र अधिक गतिमान होणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 01, 2025 9:18 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पर्यटकांसाठी आनंदाची बातमी, पानशेत आणि वरसगाव धरण परिसरात विशेष पर्यटन बससेवा होणार सुरू, पीएमपीएमएलचा निर्णय


