Pune Metro : पुण्यातील वाहतुक कोंडी कायमची सुटणार! 'या' मार्गावर धावणार मेट्रो; जाणून घ्या मेगा प्लॅन
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Govind Wakde
Last Updated:
Chakan Metro Update : पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी चाकण ते म्हाळुंगे MIDC परिसरातूनही मेट्रो मार्गाची योजना करण्यात आली आहे. वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
पुणे : नव्या मेट्रो मार्गाचा विस्तार लवकरच सुरू होणार असून यात पिंपरी-चिंचवड ते चाकण पर्यंतचा भाग जोडला जाणार आहे. या मेट्रोच्या माध्यमातून आयटी पार्क हिंजवडी आणि चाकण एमआयडीसी परिसरातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होईल अशी अपेक्षा आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या नव्या मेट्रो मार्गाची माहिती घेतली असून त्यानुसार हा मार्ग भक्ती शक्ती चौकापासून सुरू होईल. भक्ती शक्ती चौकातून मुकाई चौक, भूमकर चौक, भुजबळ चौक, पिंपळे सौदागर, नाशिक फाटा, वल्लभनगर, टाटा मोटर्स कंपनी, तळवडे एमआयडीसी आणि चाकण एमआयडीसी मार्गे चाकण शहरापर्यंत पोहचेल. प्रस्तावित मेट्रो मार्गाची लांबी सुमारे 41 ते 42 किलोमीटर असेल.
advertisement
या मेट्रो मार्गामुळे दररोजच्या वाहतुकीतील कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना जलद आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळेल तसेच औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्रांमध्ये येणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचेल आणि आर्थिक कार्यक्षमता वाढेल. महाव्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की हा मेट्रो प्रकल्प लवकरच सुरू होईल आणि यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांना आरामदायक सुविधा मिळतील.
advertisement
नव्या मेट्रो मार्गामुळे फक्त वाहनांची कोंडी कमी होणार नाही तर पर्यावरणालाही लाभ होईल, कारण रस्त्यांवरील जास्त वाहतूक कमी होऊन प्रदूषणही घटेल. हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड आणि चाकण परिसरातील लोकांसाठी मोठा बदल घेऊन येणार आहे. परंतू, प्रकल्पाची सुरुवात कधी होईल आणि काम किती वेळात पूर्ण होईल याची अधिक माहिती लवकरच देण्यात येणार आहे. नागरिकांनीही या मेट्रो प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा असे अधिकारी सांगतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2025 10:12 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro : पुण्यातील वाहतुक कोंडी कायमची सुटणार! 'या' मार्गावर धावणार मेट्रो; जाणून घ्या मेगा प्लॅन