Pune Mumbai Expressway: थर्टी फर्स्टआधीच लोणावळ्यात पर्यटकांचा 'महापूर'; पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत हा मोठा बदल

Last Updated:

यंदा सलग सुट्ट्या आल्यामुळे गुरुवारपासूनच पुणे आणि मुंबईसह देश-परदेशातील पर्यटकांनी लोणावळ्याची वाट धरली आहे. यामुळे शहरातील सर्व नामांकित हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि खासगी बंगले पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत.

पुणे-मुंबई महामार्गावर वाहतुकीत बदल (फाईल फोटो)
पुणे-मुंबई महामार्गावर वाहतुकीत बदल (फाईल फोटो)
लोणावळा: नाताळची सुट्टी, विकेंड आणि सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा-खंडाळ्यात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महामार्ग पोलिसांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. यानुसार, या मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घातली असून काही महत्त्वाच्या ठिकाणी एकमार्गी वाहतुकीचा निर्णय घेतला आहे.गुरुवारी दुपारपर्यंत वाहनांचा ओघ प्रचंड वाढल्याने पोलिसांना ही परिस्थिती हाताळताना मोठी कसरत करावी लागली.
यंदा सलग सुट्ट्या आल्यामुळे गुरुवारपासूनच पुणे आणि मुंबईसह देश-परदेशातील पर्यटकांनी लोणावळ्याची वाट धरली आहे. यामुळे शहरातील सर्व नामांकित हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि खासगी बंगले पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. भुशी धरण, टायगर पॉइंट, राजमाची गार्डन, ड्युक्स नोज आणि कार्ला-भाजे लेणी यांसारखी पर्यटनस्थळे मानवी गर्दीने अक्षरशः फुलून गेली आहेत. थर्टी फर्स्टच्या रात्रीसाठी अनेक ठिकाणी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आणि मेजवानीचे आयोजन करण्यात आले असून पर्यटकांची रीघ अजूनही कायम आहे.
advertisement
पुढील काही दिवसात ही गर्दी अधिकच वाढण्याची शक्यता असल्याने महामार्ग पोलिसांनी अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गाचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सतर्क झाले असून मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या किंवा हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी कायदा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला असून पर्यटकांनी शिस्त पाळून सहकार्य करावे, अशी विनंती पोलिसांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Mumbai Expressway: थर्टी फर्स्टआधीच लोणावळ्यात पर्यटकांचा 'महापूर'; पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत हा मोठा बदल
Next Article
advertisement
Gold Silver Return 2026 Prediction: सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं सगळं सांगितलं
सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं सगळं सांगितल
  • सरतं वर्ष २०२५ हे सोनं-चांदीसाठी ऐतिहासिक ठरलं.

  • सोनं-चांदीच्या दरात आलेल्या तेजीने गुंतवणूकदारांना शेअर बाजारापेक्षा जबरदस्त रिट

  • आता पुढील २०२६ वर्षात कोण अधिक रिटर्न देईल, यावर एक्सपर्टने भाष्य केलं आहे.

View All
advertisement