Raigad Crime : खोपोलीत नगरसेविकाच्या पतीची निर्घृण हत्या! काळ्या रंगाच्या कारमधून आले अन्... मुलीला शाळून आणताना काय घडलं?

Last Updated:

Raigad councillor husband murder : नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची विहारी येथील जया बारजवळ निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ते आपल्या मुलीला शाळेत सोडून घरी परतत असताना ही घटना घडली.

Khopoli councillor husband murder
Khopoli councillor husband murder
Raigad Khopoli Crime : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे. अशातच आता खोपोली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने नगराध्यक्षासह स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. या निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या कुटुंबावर मात्र आता दुःखाचा डोंगर कोसळलाय. राजकीय यशाचा आनंद साजरा होत असतानाच एका भीषण घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची हत्या प्रकरणाने मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

काळ्या रंगाच्या कारमधून आले अन्...

नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची विहारी येथील जया बारजवळ निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ते आपल्या मुलीला शाळेत सोडून घरी परतत असताना ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर हे काळ्या रंगाच्या कारमधून आले होते आणि त्यांनी अचानक हा हल्ला केला. या हल्ल्यामागचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement

ठिकठिकाणी नाकाबंदी

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. ही हत्या जुन्या राजकीय वादातून झाली आहे की यामागे अन्य काही वैयक्तिक कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या आरोपी फरार असून त्यांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून लवकरच सत्य समोर येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Raigad Crime : खोपोलीत नगरसेविकाच्या पतीची निर्घृण हत्या! काळ्या रंगाच्या कारमधून आले अन्... मुलीला शाळून आणताना काय घडलं?
Next Article
advertisement
Bharat Gogawale: भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून मोठी घडामोड, विकास गोगावलेंवरील कारवाईचं कारण काय?”
भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून मोठी घडामोड, विकास गोगावलेंवरील कार
  • भरत गोगावले यांचे पुत्र आणि शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना कोअर कमिटी सदस्य विकास

  • विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने तब्बल तीन वेळा फेटाळला आहे.

  • आता महाड पोलीस कोणती कारवाई करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

View All
advertisement