Loksabha Election : मावळमध्ये कुणाच्या गळ्यात पडणार माळ? या दोघांमध्ये रस्सीखेच, महायुतीसाठी ठरणार डोकेदुखी

Last Updated:

Loksabha Election : मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीतील एकाच वेळी दोन पक्ष उत्सुक असल्याने जागवाटपात डोकेदुखी ठरणार आहे.

News18
News18
पुणे, (अविनाश पर्बत, प्रतिनिधी) : मावळ लोकसभा मतदारसंघात 2014 आणि 2019 या दोन्ही वेळेस शिवसेनेचे श्रीरंग बारणे याठिकाणी मोठ्या मताधिक्याने जिंकत आले आहेत. मावळात सलग दोन टर्म शिवसेनेचा भगवा फडकत असल्यानं शिवसेनेकडून या जागेची मागणी केली जाऊ शकते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळकेही मावळमधून लढण्यास उत्सुक असल्याचं समोर आलं आहे. शिवसेनेच्या फुटीत शिंदेंची साथ धरल्यानं महायुतीकडून बारणेंच्याच नावाला पुन्हा ग्रीन सिग्नल दिला जाऊ शकतो. मात्र, अजितदादा यांचं महायुतीमधील वाढलेलं वजन पाहता त्यांनी जर का सुनील शेळकेंसाठी आणि पराभवाची जखम भरून काढण्यासाठी पुन्हा मावळ लोकसभेवर दावा केला तर नव्या वादाला नक्कीच तोंड फुटू शकतं.
श्रीरंग बारणे यांच्या जमेच्या बाजू
नेत्यांशी संपर्क
स्वच्छ प्रतिमा
भाजपमधून लढण्याची तयारी
कमकुवत बाजू
जनसंपर्क तुटला
मूलभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्यात अपयश
मतदार संघातील पर्यटन स्थळ विकास दुर्लक्षित
सुनील शेळके, राष्ट्रवादी जमेच्या बाजू
अजित पवारांचे कट्टर समर्थक
मतदारसंघात चांगला जनसंपर्क
कमकुवत बाजू
लोकसभा लढण्याचा अनुभव नाही
भाजप नेत्यांची नाराजी
सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहत आहे. यातच आता सर्व राजकीय पक्षांनी आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळविला आहे. यामध्ये सध्या महाराष्ट्रातील पुणे जिल्हा हा प्रत्येक पक्षासाठी केंद्र बिंदू बनला आहे, तो म्हणजे बारामती लोकसभेसाठी. बारामतीत नणंद भावजया एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे मावळ देखील तितकाच महत्वाचा विषय आहे. एकीकडे श्रीरंग बारणे हे पुन्हा मीच मावळ मधून लोकसभेवर निवडून जाणार असल्याचा विश्वास दाखवत आहे. दुसरीकडे मावळ मधून मित्र पक्षात सारंकाही आलबेल आहे का? हाच प्रश्न उपस्थित होत आहे. तर उबाठा गटाचाच उमेदवार हा मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांमधे आहे.
advertisement
गेल्या दहा वर्षात मावळातील कोणतेही असे गाव नाही की ज्यामध्ये श्रीरंग बारणे यांनी निधी दिला नाही. त्यामुळे पुन्हा श्रीरंग बारणे हेच महायुतीमधून निवडून येईल असा विश्वास शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या आरोप प्रत्यारोपांमध्ये विजय कुणाचा होणार? हे आता येत्या काही दिवसांत समोर येणार आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Loksabha Election : मावळमध्ये कुणाच्या गळ्यात पडणार माळ? या दोघांमध्ये रस्सीखेच, महायुतीसाठी ठरणार डोकेदुखी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement