Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ वाचणार, ‘मिसिंग लिंक’ कधी सुरू होणार? मोठं अपडेट

Last Updated:

Mumbai Pune Expressway: मुंबई – पुणे या शहरांतील अंतर जलद पार करता यावे यासाठी मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गाची निर्मिती करण्यात आली. आता आणखी एक प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे.

Mumbai Pune Expressway: मुंबई – पुणे प्रवासाचा वेळ वाचणार, ‘मिसिंग लिंक’ कधी सुरू होणार? मोठं अपडेट
Mumbai Pune Expressway: मुंबई – पुणे प्रवासाचा वेळ वाचणार, ‘मिसिंग लिंक’ कधी सुरू होणार? मोठं अपडेट
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे प्रवास आणखी जलद करण्यासाठी मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. या मार्गावरील मिसिंग लिंकचे 90 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून हा प्रकल्प डिसेंबर 2025 अखेर वाहतुकीस खुला होणार असल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात येत होते. मात्र, आता हा मुहूर्त चुकला असून आता या सुसाट प्रवासासाठी मार्च 2026 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे बांधकाम डिसेंबर अखेर पूर्ण होईल. मात्र, त्यानंतर या मार्गिकेच्या चाचण्या, तपासणी करण्यात येणार आहे. त्या यशस्वी झाल्यानंतरच ही मार्गिका सेवेत दाखल होणार आहे. यासाठी बांधकाम पूर्ण झाल्यावर तीन महिन्यांचा कालावधी लागेल. आता एमएसआरडीसीने मार्च 2026 ची नवी डेडलाईन सांगितली आहे.
advertisement
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग अपुरा
मुंबई-पुणे या शहरांतील अंतर जलद पार करता यावे यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची निर्मिती करण्यात आली. 94.5 किमीच्या या द्रुतगती महामार्गामुळे हे अंतर केवळ अडीच तासांत पार करता येऊ लागले. या महामार्गावरून मोठ्या संख्येने वाहने धावत असून राज्यातील सर्वात वर्दळीचा आणि महत्त्वाचा महामार्ग म्हणून याकडे पाहिले जाते. मात्र, हा महामार्ग देखील सध्या अपुरा पडत असून अपघाताची भीती वाढली आहे.
advertisement
30 मिनिटांची बचत
पुढील काळात देशात वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने या महामार्गाच्या आठपदरीकरणासह खोपोली-कुसगाव दरम्यान 19.80 किमी लांबीची नवीन मार्गिका म्हणजेच मिसिंग लिंक बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फेब्रुवारी 2019 मध्ये या मिसिंग लिंकच्या बांधकामास सुरुवात झाली. या प्रकल्पामुळे खोपोली-कुसगाव मार्ग सहापदरीवरून आता आठपदरी होणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवासाच्या वेळेत 30 मिनिटांची बचत होणार आहे.
advertisement
मार्च 2026 चा मुहूर्त
मुंबई-पुणे मार्गावरील मिसिंग लिंकचे बांधकाम डिसेंबर अखेरीस पूर्ण होईल. मात्र, या मार्गिकेच्या काही तपासणी आणि चाचण्या कराव्या लागणार आहेत. ही मार्गिका डोंगर-दऱ्यांतून जात असल्याने आवश्यक चाचण्या आणि तपासण्या पूर्ण झाल्यानंतरच हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे हा मार्ग मार्च 2026 अखेर वाहतुकीस सुरू होईल, अशी माहिती एमएसआरडीसीतील सूत्रांनी दिलीये.
मराठी बातम्या/पुणे/
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ वाचणार, ‘मिसिंग लिंक’ कधी सुरू होणार? मोठं अपडेट
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement