ना पत्नी, ना मुलगा… शिवसेनेकडून धंगेकर कुटुंबाला डच्चू! आता पुढचा डाव काय?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
रवींद्र धंगेकर आता आपल्या मुलासाठी आणि पत्नीसाठी वेगळा पर्याय शोधण्याच्या तयारीत दिसत आहेत.
पुणे : रवींद्र धंगेकर यांची जागावाटपामध्ये भाजपकडून कोंडी होत असल्याचं दिसून येत आहे. रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढण्याचा तयारीत असल्याचंही सांगितलं जात आहे. जागावाटपावरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. निवडून न येणाऱ्या जागा भाजप आम्हाला देत असल्याचा धंगेकर यांचा आरोप आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये रवींद्र धंगेकरांचा मुलगा आणि पत्नी यांना महायुतीने उमेदवारी नाकारली. या दोघांनाही महायुतीत उमेदवारी मिळावी यासाठी रवींद्र धंगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्तंय प्रयत्न केले मात्र भाजपने प्रभाग 24 मध्ये दोघांनाही उमेदवारी न देऊन त्यांची कोंडी केली आहे. त्यामुळे आता रवींद्र धंगेकर आता आपल्या मुलासाठी आणि पत्नीसाठी वेगळा पर्याय शोधण्याच्या तयारीत दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी रविंद्र धंगेकर यांनी भाजप-शिवसेनेची युती तुटली म्हणून सांगत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतरेदेखील रविंद्र धंगेकरांनी वेगवेगळी वक्तव्य केली. मात्र राज्य स्तरावरुन पुण्यात भाजप आणि शिवसेनेची युती होणार असल्याचं सांगितलं आणि भाजपने आज प्रभाग 24 मधील त्यांचे चारही उमेदवार जाहीर केलेत. त्यामुळे आता पत्नी आणि मुलाला महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं असेल तर त्यांना अजित पवारांची राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे दोनच पर्याय उपलब्ध आहे. प्रभाग क्रमांक 24 मध्ये भाजपने गणेश बीडकर यांना उमेदवारी दिली आहे आणि त्यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यासोबत बाकी तीन जागेवरदेखील भाजपचे उमेदवार देण्यात आले आहेत.
advertisement
भाजपच्या नेत्यांशी वैर नडलं?
धंगेकर आणि शहरातील भाजपाच्या नेत्यांमधील वैर सर्वश्रुत आहे. केवळ यामुळेच भाजप शिवसेना युतीच्या बैठकांमध्येही धंगेकर यांना लांब ठेवण्यात आलं आहे. भाजपने शिवसेनेला ज्या जागा देऊ केल्या आहेत. त्यामध्ये मध्यवर्ती शहरातील एकही जागा नाही. यावरूनही भाजप शिवसेना नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. स्वतः धंगेकर हे भाजपकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याची तक्रार नेत्यांकडे करत आहेत. एवढेच नाही तर सुरुवातीपासूनच त्यांनी अपेक्षित जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढावे. जागांसाठी भाजपची लाचारी पत्करू नये अशी भूमिका शीर्षस्थ नेत्यांपुढे व माध्यमा पुढेही मांडली आहे.
advertisement
कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मान राखला जावा, रवींद्र धंगेकरांची मागणी
प्रभाग क्रमांक 24 मधून प्रणव धनगर अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर पक्षात आपल्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मान राखला जावा, अशी मागणी देखील रवींद्र धंगेकरांनी केली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 5:43 PM IST











