Ola Uber Drivers Strike: ओला-उबेर चालकांचा संप तुर्तास मागे, पुण्यात आता इतके दर आकारणार
- Published by:Sachin S
- Reported by:VAIBHAV SONAWANE
Last Updated:
मंगळवारपर्यंत सरकारने मागण्यांवर जर तोडगा काढला नाहीतर बुधवारपासून पुन्हा बंद पुकारण्यात येईल, अशा इशारा चालकांनी दिला आहे.
पुणे : मागील काही दिवसांपासून पुण्यात खासगी ओला, उबेर आणि रॅपिडो ऑटो आणि कॅब चालकांनी बंद पुकारला होता. पण आता हा बंद मंगळवारपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. ओला, उबेर आणि रॅपिडो चालक संघटनांनी मंगळवारपर्यंत सरकारी दराने वाहनं चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपर्यंत सरकारने मागण्यांवर जर तोडगा काढला नाहीतर बुधवारपासून पुन्हा बंद पुकारण्यात येईल, अशा इशारा चालकांनी दिला आहे.
पुण्यामध्ये इंडियन गिग वर्कर्स फ्रंटने १ मे २०२५ पासून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामतीमध्ये ओला, उबर आणि रॅपिडो कॅब्सनी सरकारने ठरवलेल्या अधिकृत भाडेदरानुसारच प्रवासी वाहतूक करावी अशी मागणी केली होती. पण खासगी चालकांनी आपल्याा काही मागण्यासाठी डॉ. केशव नाना क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू केलं होतं. पण तुर्तास बंद मागे घेतला आहे. मुंबई, नागपूर व पुणे शहरातील ऑनलाईन कॅब आणि रिक्षा बंद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मंगळवारपर्यंत सरकार ला वेळ देऊन, मंगळवारी मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बुधवार पासून पुन्हा बंद करण्यात येईल. डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी सुरू केलेले उपोषण न थांबवता पुढे असेच चालू राहिल, असा इशारा चालक संघटनेनं दिला आहे.
advertisement
आता सध्या खासगी चाालक भाडे आकारणी हे सरकारी दराने www.onlymeter.in या वेबसाइटवर जाऊन प्रवासी आणि चालक आपले भाडे सरकारी मीटर दराने ठरवू शकतात.

खासगी चालक संघटनेच्या काय आहे मागण्या?
ॲप-आधारित टॅक्सी (Ola, Uber, Rapido) आणि ऑटो रिक्षांसाठी सरकारनं निश्चित केलेले दर लागू करावेत. सध्या कंपन्यांकडून मिळणारे भाडे खूप कमी असून ते इंधन खर्च, कर्जाचे हप्ते आणि गाडीच्या देखभालीस पुरेसे नाही. तसंच, ॲप-आधारित कंपन्यांचे परवाने रद्द करणे, ई-बाईक टॅक्सींना परवानगी नाकारणे, परवान्यांची मर्यादा निश्चित करणे आणि चालकांच्या कल्याणासाठी मंडळाची स्थापना करणे यांसारख्या इतर मागण्याही चालकांनी केल्या आहेत.
advertisement
प्रवाशांना नाहक त्रास
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या या बंदामुळे पुणे, मुंबई आणि नागपूरसह अनेक शहरांमध्ये प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. विशेषतः विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गैरसोय झाली. अनेक ठिकाणी जास्त दराची मागणी किंवा ऑनलाइन बुकिंग रद्द होण्याचे प्रकारही घडले.
सरकारने काय दर ठरवून दिले ते कुठे पाहायचे?
इंडियन गिग वर्कर्स फ्रंटने १ मे २०२५ पासून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामतीमध्ये ओला, उबर आणि रॅपिडो कॅब्सनी सरकारने ठरवलेल्या अधिकृत भाडेदरानुसारच प्रवासी वाहतूक करावी अशी मागणी केली होती. यानुसार, पहिल्या १.५ किमीसाठी ३७ रुपये आणि त्यानंतर प्रत्येक किमीसाठी २५ रुपये आकारले जातील. 'www.onlymeter.in' या वेबसाइटवर सरकारी दर तपासण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jul 19, 2025 9:04 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ola Uber Drivers Strike: ओला-उबेर चालकांचा संप तुर्तास मागे, पुण्यात आता इतके दर आकारणार









